रेल्वेसमोर उडी घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या.
गोंदिया, दी. 24 मे : आमगाव शहरातील आदर्श विद्यालय येथे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या मोहित चंद्रप्रकाश पटले वय 17 वर्ष या मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती, बारावीच्या निकालामध्ये तो दोन विषयात नापास झाला हे माहित होताच त्यांनी आमगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली.
ही घटना 21 मे रोजी गोंदिया रायपूर रेल्वे मार्गावर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. फेब्रुवारी/मार्च-2024 च्या विभागीय शिक्षण मंडळ, नागपुर द्वारा पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक 21 मे 2024 रोजी घोषित झाला. सर्वांना वाटते की आपण परीक्षेत पास व्हावे मात्र परीक्षा दरम्यान काही विधार्थी नापास देखील होतात, अश्यात निराश झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत आमगाव येथील विधार्थी यांनी आत्महत्या केली, त्या मुळे परिसरात दुखा:चे वातावरण पसरले होते.
मृतक मोहित हा मूळचा आमगाव जवळील ननसरी या गावातील राहणारा होता तसेच तो सैनिक भरतीची तयारी करीत होता मात्र बारावीच्या परीक्षेत आपल्याला दोन विषयात कमी मार्क मिळाले असून आपण नापास झाले हे एकूण निराशे पोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याविषयी आमगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत. परीक्षे दरम्यान नापास झालेल्या विध्यार्थि यांनी कुठलीही अनुचित घटना अंगीकरूनये या साठी शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते, असे अशले तरी आत्महत्याचे प्रकार सुरू आहेत, झालेल्या घटनेवरून पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.