सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 22 मे 2024 : सडक अर्जुनी येथील नगर पंचायत मध्ये 14 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 6 आरोपींवर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई केली होती.
नगर पंचायत सडक अर्जुनी येथे काम करणाऱ्या एका बांधकाम कंत्राटदरा कडून 1 लाख 82 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती व खाजगी इसम अशा 6 जणांना एसीबी ( ACB) ने कारवाई करीत जाळ्यात अडकविले होते. तर सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले होते. यातील सर्व आरोपींना 16 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्या मुळे सर्व आरोपींचा भंडारा कारागृहात 30 मे पर्यंत मुक्काम राहणार आहे.
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हा न्यायालयात आरोपी गटा कडून जामीन मंजूर व्हावी या करीता पुन्हा अर्ज करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्याचे सांगण्यात येत आहे. तर नगर पंचायत मध्ये पोलिस विभागाचे काही अधिकारी पुन्हा काही हाती लागते का याचा सोध घेत असल्याचंही बोलले जात आहे. सीसीटीवी सह कर्मचाऱ्यांची विचारपुर देखील सुरू असल्याचे सांगितले जाते आहे.
या गुन्ह्यात पुन्हा आरोपी वाढतील का या बाबद महाराष्ट्र केसरी न्यूज ने एसीबी च्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. तर सर्व आरोपींना 30 मे पर्यंत भंडारा जेल मध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
सडक अर्जुनी नगर पंचायत येथील 1 लाख 82 हजार लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले नगराध्यक्ष तेजराम मडावी, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद हलमारे, बांधकाम सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी, नगर सेविकाचा पती जुबेर शेख आणि खाजगी इसम शुभम येरणे असे आरोपींचे नावे आहेत. सदर प्रकरणांमध्ये आणखीन कोणी आरोपी होणार का किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हातात काही पुरावे लागतात का हे समोर पाहण्यासारखे असेल.
नगरपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यातील काही पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत तर काही कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. लालसे पोटी यातील काहींनी मुख्य मंत्री शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता. दरम्यान त्यांना पुन्हा मोठी ऑफर मिळाली त्या मुळे पुन्हा काही दिवसाने गेलेले कार्यकर्ते ( लोक प्रतिनिधी ) पुन्हा आपल्या पक्षात परतले. अशी चर्चा होती. म्हणजेच पैशासाठी वाटेल ते करू अशा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यातील नगरपंचायत मध्ये सुरू होता आणि 14 मे रोजी झालेल्या कारवाई ने ते खरे होते हे सिद्ध झाले. 15 टक्के कमिशनची चर्चा पूर्वी जणते मध्ये सुरू होती. आदी 15 टक्के कमिशन मग कामाचे पत्र देणार असे कारभार तालुक्यात सुरू आहे. त्या मुळेच हा प्रकार उघडकीस आला.