प्रतिनिधी / सालेकसा, दी. 24 नोव्हेंबर : बाघ सिंचन उजवा मुख्य कालवा अंतर्गत नवीन कोटजंभूरा लघु कालव्याचे आज 23 नोव्हेंबर रोजी आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या लघु कालव्याचे कार्य अनेक वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असले तरी कोट जंभोरा क्षेत्रातील गावांना मात्र या कालव्यातून पाणीपुरवठा होत नव्हता. यामागील कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी व शेतकऱ्यांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी क्षेत्रातील नागरिकांनी आमदार सहस्राम कोरोटे यांच्याकडे मागणी केली असता त्यावर बाघ सिंचन विभागीय अभियंता श्रेणी दोन प्रीयम शुभम यांच्याशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
त्यावर आज (२२ नोव्हेंबर) जेसीबी च्या सहाय्याने मोहाटोला ते कोटजंभूरा पर्यंत लघु कालवा दुरुस्तीचे कामाचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली. आमदार सहसराम कोरोटे यांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून प्रलंबित विषय मार्गी निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. या कार्यामुळे मोहाटोला, मोकाशीटोला, कोटजंभुरा, पोवारीटोला इत्यादी गावातील ५०० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची व्यवस्था होणार आहे.
आमदार सहसराम कोरोटे यांच्यासह सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजू दोनोडे, जिल्हा परिषद सदस्य छायाताई नागपुरे, गीता ताई लिल्हारे, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन प्रियम शुभम, पंचायत समिती चे सभापती प्रमिला गणवीर, गट नेते जितेंद्र बल्हारे, पोवरीटोला सरपंच छायाताई चौधरी, सोनपुरी सरपंच अरुण मच्छिरके, ओमप्रकाश ठाकरे, ओमप्रकाश लील्हारे, ओमकार माहुले, जागेश्वर नागपुरे, भोजलाल लिल्हारे, नोहरलाल बनोठे, पोवरीटोला उपसरपंच गणेश मेश्राम, केवलचंद नागपुरे, लेखचंद दसरिया, बाबुलाल कोहरे, सुरजलाल लील्हारे, सूकाऊ बल्हारे, तुलाचंद लील्हारे, राजेश बनोठे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.