सदू विठ्ठले यांच्या वाहनावर पहिल्यांदाच वाळू चोरी प्रकरणी जप्तीची कारवाई!


  • अवैध रित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले वाहन, महसूल विभागाच्या पथकाची कारवाई

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 17 ऑक्टोंबर : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध रित्या वाहतूक नियमित सुरू असते. ज्या मुळे गाव मार्गाचे रस्ते खराब होतात. तर महसूल विभागाला रोज लाखो रुपयांचा चुना लागते. यावर नियंत्रण व्हावे यासाठी महाराष्ट्र केसरी न्यूज ने “सौंदड – फुटाळा – नदीपात्रातून रेतीचे अवैध रित्या उत्खनन जोमात सुरू” या शीर्षकाखाली 15 ऑक्टोंबर रोजी एक बातमी प्रकाशित केली होती. आणि त्या बातमीची दखल घेत महसूल विभागाने 16 ऑक्टोंबर रोजी एका वाहनावर जप्तीची कारवाई केली आहे. ज्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाने कारवाई केली ती साधी सुधी वेक्ती नसून सौंदड येथील वाळू किंग आहे.



सोमवारी रात्री 10 : 30 वाजता सौंदड पिपरी परीसरात अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. दरम्यान वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. जप्ती करण्यात आलेले ( महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ) वाहन क्रमांक : एम. एच. 35 ए. जी. 0665 असे असून वाहन मालक नामे : सदू मारोती विठ्ठले असे असून वाहन चालक नामे : दोलत गोपाळा निर्वाण असे आहे. उप विभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे यांच्या मार्गदर्शनात शरद हलमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सौंदड परीसरातील चुलबंद नदी पात्रातून अवैध रित्या वाळू चा उपसा करून वाहतूक करणारी टोळी सक्रिय आहेत. त्यावर नियंत्रण व्हावे या दृष्टी कोनातून महसूल विभागाचे पथक फिरत आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनावर महसूल विभागाने कारवाई केली तो वाहन मालक पूर्वी शिव सेना पक्षाचा तर आता भाजप पक्षाचा मोठा नेता आहे. अंदाज काढला तर गेली ६ ते ७ वर्षा नंतर या वाळू माफियांच्या वाहनावर महसूल विभागाने पहिल्यांदाच कारवाई केली आहे. सोमवारी झालेल्या कारवाई मुळे सडक अर्जुनी तालुक्यातील वाळू माफियामध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच झालेल्या या कारवाई मुळे उप विभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे यांची उप विभागात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राजकारण्यांना न जुमानता आपले कार्य आणि कर्तव्य निभावणार पहिला अधिकारी पाहायला मिळाला आहे. विठ्ठले यांच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात थरथरतात. या मागे मोठे राजकीय वरद हस्त अशल्याचे बोलले जाते. त्या मुळे पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें