तरुणांनो यशा मागचे कष्ट ओळखा : खा. सुनील मेंढे


  • खासदार नोकरी महोत्सवात हजारो बेरोजगारांची हजेरी
  • जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, सुनिल मेंढे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप… 

भंडारा, दि. 15 ऑक्टोंबर : आपण यशस्वी लोक पाहतो. मात्र त्या यशामागील कष्ट आणि परिश्रम आपल्याला दिसत नाहीत. कष्टातूनच माणूस घडतो. संधी कुठलीही असली तरी तिचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेण्याची कसब प्रत्येकाने स्वतः मध्ये निर्माण करावी. कामाकडे लहान मोठे म्हणून न पहाता आयुष्याची सुरुवात करण्याची महत्वाची संधी म्हणून ते स्वीकारा, असा सल्ला खा. सुनील मेंढे यांनी हजारोच्या संख्येत उपस्थित तरुण तरुणींना दिला.

खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून साकार आणि स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारलेल्या खासदार नोकरी महोत्सवाचे उद्घाटन दि. 12 रोजी स्प्रिंग डेल शाळेच्या विशाल अशा पटांगणावर करण्यात आले, यावेळी खासदार सुनील मेंढे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, डॉ. उल्हास फडके, चैतन्य उमाळकर, विनोद बांते, सचिन कुंभलकर, मोहन सुरकर, अनुप ढोके, महेंद्र निंबार्ते, सूर्यकांत इलमे, आबिद सिद्दीकी, मंगेश वंजारी, आशू गोंडाने, तुषार काळबांडे, रुबी चड्डा, मंगेश वंजारी, विकास मदनकर, वनिता कुथे, सुखदेव वंजारी, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठान च्या शुभांगी मेंढे यांनी केले. नोकरी महोत्सव म्हणजे हाताला काम नसलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी चालून आलेली संधी असल्याचे त्या म्हणाल्या. मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मतानी यांनी कोणतीही नोकरी मिळाली तरी ती तेवढ्याच प्रामाणिकपणे करा, असे सांगितले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे यांनी, यशा मागचे कष्ट ओळखा असे सांगितले. कुणीही सहज यशस्वी होत नाही. त्यामागे अपार श्रम असतात. आपण मोठे झालो की स्वतःची जबाबदारी ओळखून आई-वडिलांचा आधार बना. चालुन आलेली प्रत्येक संधी ओळखून ती स्विकारण्याची तयारी ठेवा. आरामात बसून काम करण्याची मनषा बाळगून नोकरी करण्याची आस ठेवून असलेली व्यक्ती यशस्वी होणार नाही.

नोकरी किती पगाराची आणि कुठे मिळते यापेक्षा, ती मिळालेली पहिली संधी आहे, असा विचार करून ती स्वीकारा आणि स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे होऊन दाखवा, असेही खासदार मेंढे म्हणाले.
या महोत्सवासाठी जवळपास 13000 बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. आज सकाळ पासूनच तरुण-तरुणींच्या रांगा शाळा परिसरात लागल्या होत्या. प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त तीन कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्रत्येकाला विशिष्ट क्रमांक देऊन मुलाखतीसाठी आंत पाठविले जात होते.

मुलाखत झाल्यानंतर एक ते दीड तासाच्या अंतराने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रही भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, सुनिल मेंढे, शुभांगी मेंढे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. जवळपास 93 कंपन्याच्या व्यवस्थापनांनी येथे हजेरी लावून नोकरीची आस लावून दुरून दुरून आलेल्या उमेदवारांना जाणून घेतले. आलेल्या कोणत्याही उमेदवाराची गैरसोय होवू नये म्हणून खान पानापासून वाहनतळ आणि प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन आणि इतर आवश्यक व्यवस्था सुद्धा उपलब्ध होत्या. भंडारा जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांनी या ठिकाणी आपले नशीब आजमावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगेश बेलपाडे आणि पितांबर उरकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन कुंभलकर यांनी केले.


 

Leave a Comment

और पढ़ें