अर्जुनी मोर., विशेष प्रतिनिधी, 27 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी असे दोन्ही तालुके मिळून तयार झालेल्या अर्जुनी मोरगाव उपविभागात तब्बल 95 पोलीस पाटील पदाच्या नव्याने भरतीचे मुहूर्त निघाले आहे. 21 ऑगस्ट रोजी आरक्षणाची प्रक्रिया तहसील कार्यालय अर्जुनी मोर. सभागृहात पार पडली.
95 पोलीस पाटील पदापैकी 29 महिलांना पोलीस पाटील बनण्याची संधी प्राप्त झाली आहे. उपविभागातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात 68 तर सडक अर्जुनी तालुक्यात 27 असे एकूण 95 पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे. या पदासाठी 23 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून 24 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तर त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येणार आहे तर 26 सप्टेंबरला पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 5 ऑक्टोबरला नियुक्ती आदेश निर्गमित केल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त आहे.
अर्जुनी मोर उपविभागात नुकतीच कोतवाल भरती प्रक्रिया पार पडली. लगेच उपविभागातील अर्जुनी मोर व सडक अर्जुनी तालुक्यात रिक्त असलेल्या 95 पोलीस पाटील पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपविभागीय अधिकारी वरूण शहारे यांचे अध्यक्षतेखाली तारीख 21 ऑगस्टला तहसील कार्यालय अर्जुनी मोर. च्या सभागृहात आरक्षण सोडत करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार गोमासे, नायब तहसीलदार कटरे, नायब तहसीलदार त्र्यंबक गुदधे व सर्व कर्मचारी व संबंधित नागरिक उपस्थित होते. ही सर्व प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्याच्या निगराणी खाली घेण्यात आली. अर्जुनी मोरगाव उपविभागातील अर्जुनी मोर व सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांची एकूण 219 पदे मंजूर आहेत.
त्यापैकी सध्या 194 पदे कार्यरत आहेत. तर 95 पदे अनेक वर्षापासून रिक्त होती. त्या 95 रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, 21 ऑगस्ट रोजी आरक्षित केलेल्या आरक्षणा नुसार अनुसूचित जातीसाठी तीन पदे सुरगाव, ब्राह्मणी/ सडक, तुकुम नारायण ( महिला ), राखीव अनुसूचित जमाती आठ पदे त्यापैकी तिरखुरी (महिला), जांभळी /पोरला, खडकी डोंगरगाव, जुनेवाणी ( महिला), बोळुंदा, रामपुरी, थाडेझरी, विमुख जमाती अ दोन पदे, ईश्वरचिठ्ठी बामणी/ खडकी, करांडली( महिला), भटक्या जमाती ब आधीच जागा भरलेल्या आहेत. भटक्या जमाती क दोन पदे, कोसमघाट (महिला), गंधारी भटक्या जमाती ड दोन पदे, पांढरवानी/ रयत( महिला), इसापूर विशेष मागास प्रवर्ग आधीच दोन पदे भरलेली आहेत.
इतर मागास प्रवर्ग 27 पदे
बाकटी, तिडका/ अर्जुनी मोर, मंदीटोला ( महिला), संजयनगर, घाटबोरी/ तेली, घाटबोरी कोहळी, धाबेटेकडी /ब (महिला), मुंगली, खोबा (महिला), खाडीपार( महिला), खोकरी ,कवठा, पवनीधाबे, बोडदे /कवठा( महिला) , सौंदड (महिला), मुंडीपार ,नवेगाव बांध (महिला), बोंडगाव/ सुरबन, सोमलपुर; कडोली, शेंडा, खैरी/ सुकळी, परसोडी रयत; शिरेगावबांध, गुढरी (महिला), झासीनगर, उमरी,
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग 10 पदे
वडेगाव /सडक अर्जुनी; शिलेझरी, मांडोखाल टोला, धाबेटेकडी/ आदर्श, आंभोरा (महिला ), डव्वा( महिला), कोरंबीटोला, सिरोली, परसटोला भुरशीटोला( महिला ),
सर्वसाधारण खुला प्रवर्ग 41 पदे
यामध्ये मोगरा, तावशी टोली, पिंपळगाव (महिला), सुरबन, बोरटोला ब (महिला), राजोली, घोटी ,धानोरी (महिला), वडेगाव बंध्या, कोरंबी, बोरी (महिला), गौरनगर (महिला), बोरटोला, कन्हाळगाव /डों, आसोली, कोहळीटोला, महागाव, घुसोबाटोला (महिला), रेंगेपार ब, कोसबी ,जाणवा ,महालगाव, वारवी, कोहमारा (महिला), अरततोंडी ,/परसटोला (महिला), एरंडी/ सूरतोली, भदूटोला, निलज ,चान्ना, कोहलगाव (महिला) सायगाव /तुकुम (महिला) लेंडेझरी, केसलवाडा, बकी, बोपाबोडी, बुद्धेवाडा, देऊळगाव/ बोदरा (महिला), डोंगरगाव, कवठा ,भरनोली गवर्रा, बोरटोला ( महिला)
अशा एकूण 95 पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर असून प्राप्त अर्जाची छाननी सहा सप्टेंबरला होणार आहे, 23 सप्टेंबरला लेखी परीक्षा व 24 सप्टेंबरला निकाल घोषित करण्यात येईल तर 26 सप्टेंबरला पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. आणि पात्र उमेदवारांना 5 ऑक्टोबर 2023 ला नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरून शहारे यांनी दिली.
वृत्त पत्रात प्रकाशित झालेला टाईम टेबल मध्ये बदल होणार आहे. अद्याप फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मिळालेल्या टाईम टेबल मध्ये आमचे काम होणार नाही. आमच्याकडे मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्या मुळे आम्ही वेळ वाढून मागणार आहोत.
: वरून कुमार शाहारे, उप विभागीय अधिकारी, अर्जुनी मोर.