गोंदिया, 23 ऑगस्ट : स्थानिक गुन्हे शाखे च्या पोलिस पथकाने नागपूर व बालाघाट येथून दुचाकी चोरी करुन गोंदियात विक्री करणार्या 4 गुन्हेगारांना अटक करुन 4 दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलिस विशेष अभियान राबवित आहेत.
यातंर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयाच्या आधारे बालाघाट जिल्ह्यातील धापेवाडा येथून निलेश नारायण सुलाखे (19) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशी दरम्यान बालाघाट येथून एमपी 50, एमएल 8079 व एमपी 40 बीएक्स 3707 क्रमांकाच्या दुचाकी चोरी करुन विक्रीकरिता गोंदिया शहरातील टीबीटोली येथे ठेवल्याची माहिती दिली.
पोलिसांनी निलेशला अटक करुन गोंदिया येथून दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच नागपूर येथून दुचाकी चोरी करुन गोंदियात विक्रीसाठी आणणार्या आरोपींना गोंदियातील गड्डाटोली येथून अटक केली. अमन मनोज शेंडे (20) राकेश हरिचंद पराते (23) व शुभम विक्की राऊत (23) असे आरोपींची नावे आहे.
त्यांच्याकडून एमएच 40, एसआर 6828 व एमएच 35, एन 4425 क्रमांकाची दुचाकी जप्त केली. ही कामगिरी पोनि दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सफौ अर्जुन कावळे, पोहवा राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, विठ्ठल ठाकरे, कोडापे, पोशि हंसराज भांडारकर, चापोहवा लक्ष्मण बंजार यांनी केली.