सडक अर्जुनी, दिनांक : १३ जुलै : आज तालुक्यात डूग्गीपार पोलिसांच्या वतीने हेल्मेट जन जागृती मोहीम शेंडा चोक आणि कोहमारा चोक येथे राबविण्यात आली. या जनजागृतीचा तालुक्यात आज पहिला दिवस अश्ल्याने नागरिकत संभ्रम निर्माण झाला होता. की नेमक काय चालू आहे. दरम्यान पोलिसांनी १२ वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात एकूण दंड ७ हजार रुपये वाहन धारकांकडून वसूल करण्यात आला आहे. ज्या दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेट वापरले नाही अश्या वाहन धारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोडे, पोलिस उप निरीक्षक सरोदे, पोलिस हवालदार जगदेस्वर बिसेन, नायक पोलिस महेंद्र चौधरी, पोलिस शिपाई अमोल राऊत, महिला पोलिस विद्या ठाकूर उपस्थित होते. सदर कारवाई पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून डूग्गीपार पोलिस ठाण्याचे पोलिश निरीक्षक रेवचंद शिंगन्जुडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा समितीच्या मिटींग मध्ये घेण्यात आलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी
दि. ३ जुलै रोजी जिल्हाधीकारी गोंदिया यांचे कार्यलयामध्ये रस्ता सुरक्षा समिती ची मिटींग घेण्यात आली होती. सदर मिटींग मध्ये उपस्थीत असलेले पदाधीकारी व अधिकाऱ्यांनी एक मतानी वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता तसेच प्राणांतीक अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वाहन चालकांनी दुचाकी चालवतांना हेल्मेटचा वापर करावा असा एकमतांनी निर्णय घेण्यात आला होता. रस्ता सुरक्षा समितीच्या मिटींग मध्ये घेण्यात आलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी जिल्हा वाहतुक शाखा व जिल्ह्यातील संबंधीत ठाणेदारांना अवगत करून निर्देश सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. ४ जुलै ते ११ जुलै पर्यंत संपुर्ण जिल्ह्यात व गोंदिया शहरात जिल्हा वाहतुक शाखा तर्फे नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरीकांना हेल्मेटचे महत्व पटवुन देण्यात आले. दि. १२ जुलै रोजी पासुन हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध मोटर वाहन कायद्या नुसार कारवाई करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले होते.
गोंदियात २०० दुचाकी वाहन धारकांवर दंड !
या अनुषंगाने दि. १२ जुलै रोजी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरामध्ये दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान न करनाऱ्या एकुण १०६ दुचाकी चालकांविरुद्ध तसेच दि. १३ जुलै रोजी एकुण १०० वाहन चालकांविरूद्ध हेल्मेट परिधान न केल्यामुळे मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुक पोलीसांचा नागरीकांना मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करणे हा उद्देश नसुन नागरीकांच्या प्राणांची सुरक्षीतता रहावी, अपघाताचे प्रमाण कमी रहावे,आणि अपघातामध्ये डोक्याला दुखापत होवू नये नागरीकांच्या सुरक्षे करीता वाहतुक पोलीस सदरचे अभियान राबवित आहेत. नागरीकांनी कृपया दुचाकी चालवितांना उच्च दर्जाचा ( ISI MARK) चा हेल्मेट परिधान करून वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे असे आव्हान पोलिश विभाग मार्फत करण्यात आले आहेत.