मला मुख्यमंत्री व्हायचं आहे – अजित पवार… हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष!


  • अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असा ठरावही मंजूर

मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०५ जुलै : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं की, मला एक दिवस मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत असल्याचं म्हणत आमदारांना पळवलं आहे. यामुळे देशाचं राजकारण गेल्या तीन-चार दिवसात ढवळून निघालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेत पक्ष पळवणाऱ्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. आता तर अजित पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.

  • अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असा ठरावही मंजूर

अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता अजित पवार गटाने आम्हीच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्याला मिळावे, अशा आशयाचे निवेदन निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हेच आहेत, असा ठरावही अजित पवार यांच्या गटाने मंजूर केला आहे.

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसे पत्र राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच आता अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे.

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी बुधवारी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या पत्रासह त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील अर्ज केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी केलेल्या अर्जानुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय देता येणार नाही, त्यांना निर्णय देण्याआधी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू ऐकून निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. त्यामुळे आता या घटनाक्रमात निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें