पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या रेती माफियावर अखेर गुन्हा दाखल! 


गडचिरोली, कुरखेडा, ( विनोद नागपूरकर ) दिं. 15 जुन 2023 : अवैद्य विटा व रेती तस्करीची बातमी प्रकाशीत करणार्या पत्रकाराना अश्लिल शिवीगाळ केल्या प्रकरणी काल 14 रोजी सायंकाळी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे देवानंद रेवनाथ नाकाडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९४,५०६ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून. कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरी्षक भांडेकर हे अधिकचा तपास करीत आहेत. काल तालुका पत्रकार संघटना कुरखेडा च्या वतिने चोर तो चोर वरून सिरजोर पणे वागणाऱ्या गुंडेशाही प्रवृत्तीने शिवीगाळ करणाऱ्या ठेकेदार देवानंद नाकाडे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करीता पत्रकारांनी पोलीस स्टेशन ला धडक दिली होती.

तालूक्यात सूरू असलेली अवैध रेती तस्करी तसेच तहसिलदार कूरखेडा यांचा कार्यवाहीत रेतीची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेले ३ ट्रेक्टर जप्तीची कार्यवाहीची बातमी वृत्तपत्रात प्रकाशीत केल्याचा राग मनात ठेवत पत्रकाराना अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत दम देणारा या व्यवसायाशी संबधित असलेल्या इसमावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काल मंगळवार रोजी स्थानिक पत्रकार संघाचा वतीने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे ठाणेदार संदीप पाटील यांची भेट घेत निवेदना द्वारे करण्यात आली.

तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैध विटा भट्टी, रेती उपसा सूरू आहे. या संदर्भात वेळोवेळी स्थानिक पत्रकाराकडून बातम्या प्रकाशीत करण्यात येतात विशेषता सतीनदीचा काठावर असलेला कूंभीटोला हा गाव रेती तस्करीचा केंद्र बिंदु आहे. कूंभीटोला घाट व येथील स्थानिक काही वाहतूकदार अवैध रेती तस्करी करीता कूख्यात आहेत. नूकतीच येथील तहसिलदार यानी आपल्या चमू सह मध्यरात्रि सापळा रचत रेती तस्करी करताना तिन ट्रक्टर पकडले ही बातमी सूद्धा वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात आली होती. हा राग मनात ठेवत या व्यवसायाशी संबंधित असलेला कूंभीटोला येथील इसम देवानंद रेवनाथ नाकाडे याने कूंभीटोला येथीलच निवासी असलेल्या एका पत्रकाराचा घरासमोर व स्वस्त धान्य दुकान कुंभीटोला येते त्यांचा घरातील पूरूष मंडळी उपस्थित असताना अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ पत्रकाराना उद्देशून करीत होता.

यावेळी या शिवीगाळची दहा मिनटाची आडीओ क्लीप सूद्धा रेकार्डिंग करण्यात आलेली आहे. सदर माहीती व तक्रारीचे निवेदन ठाणेदार संदीप पाटील याना देण्यात आले. सोबतच पत्रकाराचे लहान बंधू हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार सुद्धा केली आहे. यावेळी तक्रार देते वेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठान, सचिव नसीर हाशमी, सहसचिव प्रा. विनोद नागपूरकर, सदस्य उपाध्यक्ष विजय भैसारे, महेन्द्र लाडे, कृष्णाजी चौधरी, ताहीर शेख, शिवा भोयर, चेतन गहाणे, सूरज गावतूरे उपस्थित होते.

पत्रकाराना शिवीगाळ करणारा देवानंद नाकाडे हा गूंड प्रवृत्तीचा असून यापूर्वी सूद्धा त्याचा विरोधात कूरखेडा पोलीस स्टेशन येथे शिवीगाळ व भांडण प्रकरणात ३ वेळा अदखल पात्र गून्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र त्याचा विरोधात ठोस कार्यवाही न झाल्याने त्याची हिम्मत वाढलेली आहे. तालूक्यात रेती तस्करी हा अवैध व्यवसाय संघटीत पणे करण्यात येत असल्याने या अवैध व्यवसायाचा बातम्या प्रकाशीत करणार्या पत्रकारावर तस्कराकडून गंभीर हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामूळे वेळीच यांचा मूस्क्या आवळणे गरजेचे आहे. सदर बाब सूद्धा चर्चे द्वारे पत्रकार संघाचा पदाधिकार्यानी ठाणेदार संदीप पाटील यांचा निदर्शनात आणून दिले होते.


 

Leave a Comment

और पढ़ें