शिवसेना शिंदे गटात; सुगत चंद्रिकापुरेंच्या पक्ष प्रवेशामुळे बडोलेंच्या तिकिटाला कात्री!


गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 27 मे 2023 : येत्या 2024 च्या विधान सभा क्षेत्राच्या निवडणुका समोर आहेत. अश्यात काही उमेदवार पक्ष प्रवेश करून आपली जागा निच्छित करण्याच्या तयारीला लागले आहे. आपण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राच्या जागेबद्दल बोलत आहोत. कारण या जागेवर एस. सी. उमेदवाराची राखीव शीट अश्ल्याने अनेक हौसी उमेदवार आमदार होण्याच्या सर्यतीमध्ये उतरणार आहेत. आणि त्याची तयारी गेली वर्ष भरापासून चालू आहे.


सुगत चंद्रिकापुरे शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश वर माजी मंत्री बडोले यांची प्रतिक्रिया!


पूर्वी लाखांदूर, साकोली आणि गोरेगाव असे मिळून विधान सभा क्षेत्र होते. त्यावेळी कॉंग्रेश पक्षाची सत्ता होती. आता त्यातील काही भाग  मिळून अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र झाले. असे काही जाणकार सांगतात. अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राची निर्मिती झाल्या नन्तर भाजप पक्षाचा गढ झाला आणि राजकुमार बडोले साहेब याच ठिकाणावरून दोनदा निवडणूक जिंकून आमदार झाले. तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सुद्धा झाले.अत्यंत सरळ स्वभावाचे नेते म्हणून बडोले त्यांची ओळख आहे. असे अशले तरी ते तिसर्यांदा निवडणूक जिंकू शकले नाही.


हे ही वाचा : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सुपुत्रा सह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश! 


कधीही कुणाची कायम सत्ता राहत नाही… 

काही जाणकार सांगतात. २००९ मध्ये राजकुमार बडोले आमदारकीची निवडणूक जिंकण्या मागे नाना पटोले यांचा भाजप प्रवेश मुळे ते शक्य झाले. तर २०१४ मध्ये राष्टवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेश यांची आघाडी तुटल्यामुळे वेगवेगळी निवडणूक लढली त्या मुळे मत विभाजन झाल्याचा फायदा राजकुमार बडोले यांना झाले. त्या मुळे ते निवडून आले. तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेश ची आघाडी कायम राहिल्यामुळे आघाडीचा उमेदवार जिंकला. राष्टवादी पक्षाचे नेते मनोहर चंद्रिकापुरे हे आमदार झाले. आता हे क्षेत्र राष्ट्रवादी पक्षाचे गढ आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र कधीही कुणाची कायम सत्ता राहत नाही. हे कुणीही विसरू नये. ही चर्चा आपण आज का करतोय हा देखील चर्चेचा विषय आहे मंडळी.

शिव शेना पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात खळबळ

कारण अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्राचे आणि राष्ट्रवादि पक्षाचे सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोर येथील आजी माजी नगर अध्यक्ष आणि नगर सेवकासह शिवसेना शिंदे गटात जवळपास 20 ते 25 कार्यकर्त्यासह 26 मे रोजी पक्ष प्रवेश केला. त्या मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता खुद्द आमदारांचा सुपुत्र जर दुशर्या पक्षात जात असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचा विषयच सोडा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांचा 26 मे रोजी पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे काही दिवसा पूर्वी भाजप च्या वाटेवर अश्ल्याची चर्चा होती. मात्र अचानक शिव शेना पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राची जागा शिंदे शिवसेना गटाला!

चर्चा आहे की येत्या निवडणुकी काळात अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राची जागा शिंदे शिवसेना गटाला मिळणार आहे. म्हणजे भाजप पक्षाला तिकीट मिळणार नाही. असे यावरून समजते. याबद्दल अध्याप कुठलीही अधिकुत माहिती नाही. हे सुद्धा आपण लक्ष्यात घ्यावे. काही दिवसा पूर्वी चर्चा होती की डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे भाजप पक्षात जाणार आणि ते भाजप पक्षाच्या तिकीट वरून आमदारकीची निवडणूक लढणार. कारण राष्ट्रवादी पक्षात समोर मोठे बदल होणार अश्ल्याने आमदारकीची तिकीट कुणा तिसर्याला मिळणार अशी देखील चर्चा आहे. मात्र सदर जागा ही भाजपच्या कोट्यात येणार नाही हे त्यांच्या लक्ष्यात आल्याने ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात न जाता शिवसेना शिंदे गटात गेले. त्यामुळे आमदारकीची तिकीट चंद्रिकापुरे यांच्या खिश्यात जाणार यात काही संक नाही. चर्चा आहे की या पक्ष प्रवेशामुळे माजी मंत्री बडोले यांच्या विधान सभा निवडणुकीच्या तिकिटाला कात्रील लागणार आहे. आता ही जागा शिंदे शिवसेना गटाला गेल्यास माजी मंत्री राजकुमार बडोले पक्षासी बंड करीत निवडणुकीत अपक्ष उभे राहणार का ? हे देखील पाहण्या सारखे असेल.

तसे काही होणार नाही : माजी मंत्री राजकुमार बडोले

नुकतेच पक्ष प्रवेश झाल्याने अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्राची जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार त्यावर आपल्याकडे काय पर्याय अश्णार अशी विचारणा पत्रकारांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना केली असता त्यांनी तस काहीच होणार नाही, तर हा भाजपाचा गड होता आणि राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र बडोले यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे दृश्य पाहण्यासाठी मिळाले हे तितकेच खरे. येत्या काळात यात काय फेर बदल होणार हे पाहणे तितकेच महत्वाचे असेल. मात्र त्याहूनही जर शिवसेना शिंदे गटाला सदर जागा गेल्यास भाजप पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाचे पालन करतील काय ? हा देखील संसोधनाचा भाग असेल.

आपण सेवट पर्यंत राष्ट्रवादी पक्षात राहणार : आ. मनोहर चंद्रिकापुरे

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांना देखील या प्रकाराची कुठलीही माहिती आपल्याला नश्ल्याचे त्यांनी प्रेस नोट मधून स्पठ केल आहे. आपण सेवट पर्यंत राष्ट्रवादी पक्षात राहणार अश्ल्याचे सांगितले आहे. महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीला गोंदिया जिल्ह्यात जबरदस्त खिंडार पडलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें