पालकमंत्री नवाब मलीक यांची आमदार चन्द्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट.


गोंदिया, दिनांक 03 मे 2021 – गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच जिल्ह्यात 02 मे रोजी दौरे होतेे,  याची सुरुवात आमदार मनोहरराव चन्द्रिकापुरे यांच्या जनसपंर्क कार्यालय कोहमारा येथील भेटीने झाल.

नामदार नवाब मलिक पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांचे 45 मिनटाचे भेटी दरम्यान खालील विषयाबाबत आमदार महोदयानी त्यांना अवगत केले. 1 )  धान खरेदी केंद्रावर जमा धानाची उचल करणे व रब्बीचे धानाची खरेदी सुरू करणे. , 2 )  खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व रासायनिक खताचे कृषी केंद्रावर पुरेशा प्रमाणात उपलब्धता करणे., 3 ) नियमित कर्ज फेड करण्याच्या शेतकऱ्यांना कर्ज माफ योजने अंतर्गत प्रोत्साहन राशी मिळणे . , 4 ) मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड तपासणी, लसीकरण , औषधाची उपलब्धता व ऑक्सिजन सिलेंडरचा नियमित पुरवठा करणे.

बैठकीनंतर नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री यांनी ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटर सडक-अर्जुनी ला भेट दिली, मा. जिल्हाधिकारी ,वैद्यकीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी कोविड बाबत केलेल्या उपाय योजनेची माहिती दिली. कोविड सेंटर सडक अर्जुनी ला एक रुग्णवाहिका देण्याचे जिल्हा प्रशासनाने मान्यकेले.


 

2 thoughts on “पालकमंत्री नवाब मलीक यांची आमदार चन्द्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट.”

Leave a Comment