गोंदिया-कोहमारा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग.

गाडी जळून संपूर्ण खाक, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

गोंदिया, दि. 27 मे 2024 : गोंदिया – कोहमारा महामार्गावर स्कार्पिओ गाडीला अचानक आग लागल्याने स्कार्पिओ गाडी (The burning car) संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना 26 मे च्या रात्री 9 – 30 वाजता दरम्यान घडली. पांढरवानी येथील एक कुटुंब भंडारा जिल्ह्यातील चांदपूर देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते.

हे ही वाचा : अहिंसक अंगुलीमाल महानाट्याचे आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने जिल्ह्यात प्रथम आयोजन. 

चांदपूर येथून परत येत असताना डव्वा गावाजवळ अचानक स्कार्पिओ गाडीमधुन धुर निघु लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली. त्यानंतर गाडीमध्ये बसलेले 8 लोक बाहेर निघाले. (A major accident was avoided ) मात्र, थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारन केले.

या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र स्कार्पिओ गाडी क्रमांक : एम.एच. 06 बी.यू 1733 पूर्णत जळून खाक झाली. यामध्ये वाहन मालकाचा लाखो रुपयांचा नुकसान झाला. गोंदिया वरून कोहमारा कडे जात असताना ही घटना घडली. घटना स्थळावर महामार्ग पोलीस व डूग्गीपार पोलिसांची टीम पोहचली, ( A team of Doogipar police came ) घटना महामार्ग क्रमांक : 753 वर घडली असून काही काळ सर्व वाहतूक ठ्प होती. आगीवर नियंत्रण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. स्वप्निल पतिराम टेंभुर्कर रा. पांढरवानी, ता. देवरी जिल्हा गोंदिया यांच्या ताब्यात सदर वाहन होते. ते चांदपुर वरून देवरी येथे जात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें