सौंदड, दी. २७ नोव्हेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी मा. जगदीश लोहिया, संस्थापक – अध्यक्ष, लो. शि. संस्था, सौंदड, यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल यांच्या मार्गदर्शना नुसार विद्यालयात जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, पर्यवेक्षक मा. डी. एस. टेंभुरने यांच्या प्रमुख आतिथ्याखाली संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तसेच संविधानाच्या पुस्तकाचे सुद्धा पूजन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील स. शिक्षक श्री. एस. पी. मांडारकर, श्री. टी . बी. सातकर, श्री. डी. आर. दिघोरे तसेच विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. टी . बी. सातकर यांनी केले, तर आभार एस. पी. मांडारकर यांनी मानले.