सडक अर्जुनी , दी. 27 नोव्हेंबर : आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या द्वारा आयोजित सविधान गौरव दिन महोत्सव अर्जुनी मोरगाव येथे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रंगणात “आम्ही भारताचे लोक” या संगीतमय महानाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संविधानाचे उद्दिष्टे वाचून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात सीमा पाटील व जॉली मोरे यांच्या भीम बुद्ध गीताचा नजराना पोवाडा शाहिरी बाणा सादर झाले करण्यात आले. त्या पूर्वी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कडाक्याची थंड असताना देखील यावेळी सेकडोच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. तर यावेळी उपस्थित मान्यवरानी मंचावरून आपले मत वेक्त केले.
याप्रंसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदर मनोहर चंद्रिकापुरे होते तर उद्घाटक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, प्रमुख अतिथी राजेश नंदागवळी माजी जी.प. सभापती, नगरध्यक्ष मंजुषा बारसागडे, जि.प. सदस्य सुधा रहांगडाले, जि.प. सदस्य कविता कापगते, रत्नदीप दहिवले, अजय लांजेवार, गजानन डोंगरवार, प्रमोद लांजेवार , अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, डी. यु. रहांगडाले, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, दानेश साखरे, रिता लांजेवार सह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
- संपूर्ण देशाचे प्रेरनास्थान भारतीय संविधान आहे. आणि त्याचे भास्यकार आणि शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन सीमाताई पाटील आणि मोरे साहेब हे या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जन जागृती करीत आहेत. आणि त्यांचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. परंतु अशा प्रकारचे मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून समाज परिवर्तन आणि देशाला दिशा देणार दिग्दर्शन अत्यंत सुंदर काम ते करीत आहेत.
- – आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र.
- कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला, समाजाला दिशा देणारे होते. सर्व समावेशक असा कार्यक्रम अर्जुनी मोरगांव येथे आयोजित करण्यात आला. दोन कार्यक्रमाची तुलना होऊ शकत नाही. सडक अर्जुनी मध्ये झालेला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम हा वेगळा होता. मात्र अर्जुनी मोर. येथे आज झालेला हा कार्यक्रम उच्च दर्जाचा होता. लोकांना खूप काही या कार्यक्रमातून सिकायला मिळाले.
- – सुगत मनोहर चंद्रिकापुरे, सामाजिक कार्यकर्ता विधानसभा अर्जुनी मोर.