गोंदियात; आमदार बच्चू कडू यांनी स्वतः दिव्यांग बांधवांजवळ जाऊन तपासले अर्ज


  • दिव्यांगाच्या दारी या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनावर बच्चू कडूनी व्यक्त केली नाराजगी.
  • दिव्यांग बांधवांकरीता स्वतंत्र घरकुल योजना सुरू होईल.

गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 17 ऑगस्ट 2023 : दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आज 17 ऑगस्ट रोज गुरुवाला गोंदियात दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे उपस्थित होते.



यावेळी कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांसाठी बसण्याची पुरक व्यवस्था नसल्याने आणि वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यातच व्यवस्थित साऊंड सिस्टम नसल्याने आमदार बच्चू कडू यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनावर नाराजगी व्यक्त केली.



येत्या डिसेंबर पर्यंत दिव्यांगांसाठी नवीन धोरण आणणार असल्याचे मंचावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्याप्रमाणे एस.सी., एस.टी. आणि ओबीसी यांना विविध यौजनेतून घरकुल योजना देण्यात येतात. त्याच प्रमाणे दिव्यांग बांधवांकरीता गाडगेबाबा किंवा आनंद दिघे यांच्या नावाने स्वतंत्र घरकुल योजना सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.



यावेळी उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारले की राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करत हे जुमले बाज सरकार आहे. असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रतिउत्तर देत आमदार बच्चू कडू यांनी जुमले असो की काही असो काम करतो ना प्रश्न मिटला. कोणत्याही सरकारला नाव काही ठेवा पण काम करणाऱ सरकार आहे. हे महत्त्वाचं आहे. ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

अजितदादा आले म्हणून मंत्रीपद तुम्हाला मिळाला नाही. असे प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता मी दिव्यांगांच्या कार्यक्रमात आलो आहे. यावर बोलणार नाही. असे म्हणत राजकीय प्रश्नांवर त्यांनी बोलण्याचे टाळले. यावेळी हजारोंच्या संख्येने दीव्यांग बांधव उपस्थित होते.

त्यांनी मंचावरून बोलताना खंत वेक्त केली की आपण स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करतोय मात्र अद्याप दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड उपलब्ध करून देऊ शकलो नाही. ही शोकांतिका आहे. मी गोंदियात पुन्हा डिसेंबर नंतर येणार आहे. तेव्हा जिल्ह्यात कुठलाही दिव्यांग वेक्ती युडीआयडी कार्ड पासून वंचित राहता कामा नये असे दिसून आल्यास कारवाईला समोर जावे लागेल कलेक्टर असे मंचावरून त्यांनी स्पष्ट ठणकावून सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें