- ३ शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
गोंदिया, दि. 17 ऑगस्ट : गोंदियातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेल्या ३ शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी सहलीसाठी 4 शिक्षक मित्र तमांगता धरण या ठिकाणी गेले होते. यामध्ये 3 शिक्षकांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.
एन. मिश्रा (रा. भिलाई), अरविंद सर (रा. उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (रा. नागपूर) असे यामध्ये मृत पावलेल्या शिक्षकांची नावे आहेत. गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत असताना गोंदियात वास्तव्याला असलेले सदर शिक्षक मूळचे यातील एक शिक्षक नागपूर, एक भिलाई आणि एक उत्तर प्रदेश येथील आहेत.
हे तिन्ही शिक्षक लागोपाठ दोन दिवस सुट्टीचे आल्याने गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गाचे हे तिन्ही शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेले होते. यादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. मीडिया ने दिलेल्या माहिती नुसार
या तिन्ही शिक्षकांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या मृतदेहावर आज राजनांदगाव जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे.