- शासनाला 11 करोड़ 50 लाख रुपयांचा महसूल मिळवून दिल्याने प्रशस्तिपत्र देऊन गौरव.
गोंदिया, दि. 17 ऑगस्ट : पोलीस मुख्यालय कारंजा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सीओ अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगले यांच्या उपस्थित राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार तायवाडे यांच्या मुळे शासनाला 10 करोड़ों 50 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याने त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. 2019 मध्ये मुंबई ते हावड़ा तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खणीजाची चोरी केली जात आहे. अशी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी आपल्या जिवाची परवाह न करता केलेली होती.
ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर पिवीआर कंपनीवर 11 करोड़ 50 लाख रुपयांचा दंड लावलेला आहे. व वसुल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तसेच आपल्या जिवाची परवाह न करता अशा अनेक प्रकरणात तायवाडे मुळे शासनाला करोड़ों रुपयांचा महसूल प्राप्त झालेला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
जेणेकरुन शासनाला भविष्यात आणखी महसूल प्राप्त होण्यास मदत होईन. व शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाई करण्यास शासनास मदत होईल म्हणून राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी मिडिया व समाजकार्य या श्रेत्रात मोलाची कामगीरी बजावल्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, सोनू कुथे सभापति कृषि विभाग जिल्हा परिषद, संजय टेंभरे बांधकाम सभापति जिल्हा परिषद, मुनेश्वर राहांगडाले सभापति पंचायत समिति , गंगाधर परशुराम जिल्हा अध्यक्ष एनसीपी, राजु (एन) जैन, रविकान्त ( गुड्डू ) बोपचे, आदींना दिला आहे.