अर्जुनी/ मोर. दिं. 17 ऑगस्ट : गट ग्रामपंचायत बोरी/सावरी अंतर्गत आसोलि येथे आज दिनांक 16 ऑगस्ट 2023, रोज बुधवारला, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून 9.40 लक्ष रुपयाच्या मंजूर करण्यात आलेल्या व बांधकाम पूर्ण झालेल्या नवीन अंगणवाडी भवनाचे उद्घाटन व लोकार्पण अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लहान चिमुकल्या बालकांच्या मनामध्ये आमूलाग्र बदल घडवून संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका यांची आहे. ही पिढी उद्या देशाचे आधारस्तंभ असून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणार आहे. गट ग्रामपंचायत बोरी अंतर्गत बोरी, सावरी, आसोलि गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली.
नवीन अंगणवाडी भवनाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सरपंच मधुकर ठाकरे ग्रामपंचायत बोरी, उपसरपंच विनोद रामटेके, लोकपाल गहाणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,भैय्या नाकाडे ग्रामपंचायत सदस्य, तेजराम मडावी ग्रामपंचायत सदस्य, ललिता नाकाडे ग्रामपंचायत सदस्य, बंडूभाऊ भेंडारकर, भगवान नाकाडे उपसरपंच कोरंभीटोला, कमलेश वंजारी ग्रामपंचायत सदस्य कोरंभीटोला, दुधराम नाकाडे, मारोती मसराम, सौ किरण नेवारे अंगणवाडी सेविका, ललिता कांबळे अंगणवाडी सेविका, किशोर नाकाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, देवेंद्र डोंगरवार, नामदेव नाकाडे, दशरथ सूरपाम माजी सरपंच, हिवराज मोहजणवार, लक्ष्मण नाकाडे, नरेश कालसर्पे, प्रदीप दूधकुमार, दयाराम कालसर्पे वैशाली डोंगरवार अंगणवाडी सेविका, वनिता राऊत अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होते. मोठय़ा संख्येने आसोलि गावातील नागरिक व अंगणवाडीचे विद्यार्थी उपस्थित होते.