आझादी का अमृत महोत्सव निमीत्त 500 लोकांची नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न.


अमरावती, अचलपूर, दि. 13 ऑगस्ट 2022 : महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 13 ऑगस्ट 2022 रोजी नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मे वाटप व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव निमीत्त माजी खा.पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी, रोटरी क्लब अचलपूर यांच्या सहकार्यातून आज अचलपूर तालुका मधिल ग्रामीण व शहर भागातील 500 लोकांची नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मे वाटप करण्यात आले व काही रुग्णांची नेत्र तपासणी करून नेत्र शस्त्रक्रिया करुन दिल्या. जातील हे कमीत कमी 12000 नेत्र संकल्प नेचे मानस अभय माथने शहर अध्यक्ष भाजपा, सुधीर भाऊ रसे भाजप उपाध्यक्ष यांनी समोर ठेऊन संकल्प घेतला आहे.

पुढील शिबिराचे नियोजन लवकरच घेण्यात येईल असे अक्षय कात्रे अचलपूर धनगर समाज संघर्ष समिती यांनी सांगितले पुढे महाशिबिर सुद्धा घेऊ तालुक्यातील सर्व लोकांना या महाशिबिरचा लाभ देण्याचा संकल्प घेतलं आहे. आज अहिल्या देवी होळकर यांची पुण्यतिथी निमित्त हा प्रण घेतला आहे. समाज सेवा ही येथून पुढे घडवण्याचे भाग्य तालुक्यातील जनतेने द्यावे. असे अभय दादा माथने व सुधीर भाऊ रसे मनीष खंडेलवाल व रोटरी क्लब भारतीय जनता पक्ष अचलपूर सर्व पदाधिकारी यांना संधी द्यावी. सर्व तालुक्यात कुठे दहीहंडी चा व्यर्थ खर्च न करता समाज सेवा घडावी हे उद्दिष्ट समोर ठेवले त्याबद्दल अभय दादा माथने, सुधीर भाऊ रसे, मनीष खंडेलवाल व सर्व पदाधिकारी यांचे आभार अक्षय कात्रे धनगर समाज संघर्ष समिती यांनी मानले लवकरच पुढील शिबीर नियोजनाचा टप्पा घेण्यात येईल असे दरम्यान सांगितले.


 

Leave a Comment