त्या आरोपीला २४ तासात २ वर्ष कारावास, ४००० रुपये दंडाची शिक्षा { जिल्ह्यात पहील्यांदाच सुपरफास्ट कामगिरी }


  •  विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अर्जुनी मोर पोलीस स्टेशनची कामगिरी.

गोंदिया, दिनांक :- २९ जून २०२२ : अर्जुनी मोर तालुक्यातील अरुणनगर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दिनांक २७ जून २०२२ रोजी अर्जुनी-मोर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाली होती. अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर १८० / २०२२ भा.द.वि. कलम ३५४, ३५४ [अ]  प्रमाणे गुन्हा दाखल केला.

अर्जुनी-मोर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली व जलद गतीने तपास पूर्ण करून २४ तासाच्या आत आरोपीला दोषारोप पत्रासह मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात हजर केले. मा. न्यायालयाने सर्व प्राप्त पुराव्यांची पडताळणी करून आरोपीला २ वर्ष कारावास व ४००० रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे. विनयभंगाच्या गुन्हयाचा संपूर्ण तपास

व निकालास २४ तासात पूर्ण केल्याची गोंदिया जिल्ह्यातील अतिशय दुर्मिळ केस आहे. अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी मागील महिन्यातच एका घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासांमध्ये संपूर्ण तपास करून १५ दिवस कारावासाची शिक्षा मा. न्यायालयाने ठोठावली होती.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांनी केलेला आहे. या गुन्हयाच्या तपासामध्ये पोलीस अंमलदार दीपक खांडेकर, गौरीशंकर कोरे, प्रवीण बहिरे, श्रीकांत मेश्राम, रमेश सेलोकर, चंद्रकांत भोयर, विजय कोटांगले, राहुल चिमणकर, दिलीप वाढई यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पोलीस स्टेशन अर्जुनीमोर बचे ठाणेदार सोमनाथ कदम तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि संभाजी तागड यांचे अभिनंदन केले आहे.


 

Leave a Comment