सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक ; २९ जून २०२२ ; सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयु्क्त विद्यमाने लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक-संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने व मधुसूदन अग्रवाल प्राचार्य यांच्या मार्गदर्शना नुसार दि. 26/06/2022 रोज रविवारला विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयातील प्रामुख्याने उपस्थित कु. उमा बाच्छल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतीमेला माल्यार्पण केले. तसेच मुख्याध्यापक मनोज शिंदे , प्राध्यापक तुलाराम चांदेवार व विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्याध्यापक मनोज शिंदे , शारीरिक शिक्षिका कु. उमा बाच्छल, उ.मा. शिक्षक, डी.ए.दरवडे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर व सामाजिक कार्यांनी भारतीय समाज व्यवस्थेवर केलेल्या आमूलाग्र परिवर्तनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन स. शिक्षिका कु. उर्मिला डोये यांनी तर आभार स. शिक्षक टी. बी. सातकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.