- केंद्र सरकारने धान खरेदी ची मर्यादा वाढावी…
गोंदिया, दीं. 16 जून 2022 : सन 2021-22 या रब्बी हंगामामध्ये धान खरेदी सुरु करण्यात आली. 9 लक्ष 12 हजार क्वीटल खरेदीवर केंद्र शासना कडून एवढीच परवानगी असल्या चे सांगून धान खरेदी बंद करण्यात आली. या वर्षी 17 क्वीटल खरेदी चे परवानगी कृषी विभागा मार्फत देण्यात आली.
उपरोक्त खरेदी प्रमाणे फक्त 35 टक्के शेतकऱ्याची खरेदी झाली 65 टक्के शेतकऱ्याचे धान अजूनही शेतात किंवा घरीच पडलेले आहेत त्या मुळे येणाऱ्या खरीप हंगामा करिता शेतकऱ्यांजवड खते -बियाणे व इतर शेतीची साधने घेण्या करिता पैसा नाही.
करिता आपणास विनंती करण्यात येत आहे. कि सुरवातीला केंद्र सरकारने 4 लक्ष 79 क्वीटल मर्यादा होती नंतर राष्ट्रवादी ने वारंवार मोर्चे काढले त्याची दखल घेत 9 लक्ष 12 हजार क्वीटल एवढी केली शेतकऱ्यांनी आनलाईन केलेल्या आकडेवारी नुसार 32 लक्ष क्वीटल ते 33 लक्ष क्वीटल पर्यंत शासकीय धान खरेदी ची मर्यादा केंद्र सरकारने द्यावी या करिता सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तहसीलदार बागडे सडक अर्जुनी यांना निवेदन देहून ते निवेदन पतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्र सरकारला पाठवण्यात आले.
या निवेदनाची दखल न घेतल्यास उग्र आदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्या वेडेस उपस्थित तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार, रमेश चुऱ्हे मा. जी. पं सदस्य, तेजराम मंडावी नगर पचायायत नगरा अध्यक्ष, वदना डोगरवार, रुकीराम वाढई, उमराव मांढरे, शिवाजी गहाणे, रजनीताई गिऱ्हेपुंजे महिला तालुका अध्यक्ष, मुम्निश्वर कापगते, सुभाष कापगते, आनंदकुमार अग्रवाल, दिलीप गभने, कामिनी कोवे, प्रमोद लांजेवार भागवत झिंगरे, श्रीराम झिंगरे, सुखदेव कोरे, मोतीराम कापगते, अमीन शेख, हेमराज खोटेले,धनराज भेंडारकर, देवचन टेम्भूर्न, प्रमिला मटाले व मोठया संख्येने कार्यकरते उपस्थित होते.