सौन्दड परिसरात चोरीच्या घटनेवर नियंत्रण करण्यासाठी डुग्गीपार पोलिसांचे नियोजन.



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 07 ऑगस्ट 2021 – सौन्दड परीसरात दिवसेंदिवस चोरी/घरफोडी व ईतर घटनामध्ये वाढ होत असल्याने त्यावर प्रतिबंध बसावा व आगामी येणारे सण उत्सव दरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी करीता दि. 06/08/2021 रोजी हाँटेल डाल्फीन सौंदड येथे मौजा सौंदड येथील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत बेठक घेण्यात आली.

डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन वांगडे यानी वाढत्या चो-यांवर विघटनकारी लोकांवर व गुन्हेगारावर प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातुन मौजा सौंदड येथे ग्राम सुरक्षा दल याना सतर्क करुन त्यांचे मार्फतीने गावात जास्तीत जास्त गस्त वाढविण्याबाबत तसेच सर्व दुकानदार यानी आप आपले दुकानासमोर संपुर्ण परीसर दिसावा असे सी.सी.टी.व्ही. कँमेरे बसविण्याबाबत तसेच परीसरात अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास त्वरीत पो.स्टे.ला माहिती देण्याबाबत उपस्थीत व्यापारी वर्गा सोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.

सदर बैठकीला मौजा सौंदड येथील व्यापारी वर्ग व पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार श्री सचिन वांगळे , बिट अंमलदार पो.हवा. रवि चौधरी, पो.ना. उत्तम दहीवले, पो.ना. गावडकर हे उपस्थीत होते.


 

Leave a Comment