कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांच्यामुळे परस बागेतून 50 हजाराचे उत्पन्न.



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 27 जुलै 2021 – गेल्या अनेक वर्षे पासून महानंदाबाई शेंडे खडकी/बा. या आधीवासी वस्तीत घराच्या मागे असलेल्या पळीत निकामी 15 गुंठे जागेवर भाजीपाला लागवड करून स्वतः घरची भाजीपाल्याची गरज भागवत होत्या. शिल्लक उत्पादन झालेला भाजीपाला. शेजारी असलेल्या बाम्हणी या गावी विकण्याचा नित्यनेम त्यांचा होता. कृषि विभागाचे कृषि सहाय्यक श्री राजशेखर राणे यांनी सदर 15 गुंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने ठिबक व प्लास्टिक मल्चिंग वर भाजीपाला लावण्या बाबद मार्गदर्शन केले.

तसेच सर्व साहित्य उपलब्ध करून जोडणी सुद्धा करून दिली. त्यावर महानंदाबाई यांनी चौळी ,वाल, वांगी अश्या प्रकारे भाजीपाला लागवड केली.आतापर्यंत चिल्लर भाजीपाला विक्रीतुन अंदाजे 20000/- प्राप्त झाले असे त्या सांगतात तसेच चालू उत्पादनातून किमान 50,000/- चे उत्पन्न अपेक्षित आहे.
महानंदाबाई सांगतात कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले व सर्व शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या कर्मचारी/अधिकारी यांच्या संपर्कात रहावे असे आवाहन सुद्धा केले आहे.


 

Leave a Comment