समाज मंदिर व शाळा झाले गोडाऊन धान्य खरेदी केंद्र चालु


  • सौन्दड, माऊली, खोडसीवणी, येथे 6 हजार बारदाना उपलब्ध.
  • एकाच दिवशी तब्बल 1300 शे क्विंटल च्या पुढे धान्याची खरेदी.

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 जून 2021 – ( बबलू मारवाडे ) – तालुक्यातील ग्राम सौन्दड, माऊली आणि ग्राम खोडसीवणी येथे धान खरेदी केंद्र दि. सहकारी भात गिरणी सौन्दड च्या वतीने चालू करण्यात आली आहे.

भारत गिरणीचे अध्यक्ष श्री. रमेश भाऊ चुर्हे यांनी माध्यमांशी बोलतान्हा सांगितले की काही तांत्रिक कारणामुळे गोडाऊन उपलब्ध नाही. त्या मुळे गावकऱ्यांच्या अनुमतीने समाज मंदीर, शाळा व मिळेल त्या ठिकाणी धान्य खरेदी करणे चालू आहे.

शेतकऱ्यांचा धान लवकरात लवकर खरेदी करण्याचा आपला माणस असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, त्यातच त्यांनी सांगितले की दिनांक – 11 जून रोजी धान्य खरेदी चालू केली असुन एकाच दिवसात तब्बल 1300 शे. किंटल धनाची खरेदी करण्यात आली असुन आज शासनाच्या वतीने 6000 हजार बरदाना उपलब्ध झाला आहे, आणि अजून प्रयत्न चालू आहे.

जिल्ह्यातील धान मिलिंग शासनाच्या काही तांत्रिक कारणामुळे बंद होती, त्यातच संपूर्ण गोडाऊन फुल असुन गोडाऊन च्या बाहेर देखील धान्याचे ढीग लागले आहे, आता धान्य मिलिंग करिता उचल करणे चालू आहे, मात्र धाना ची उचल झाल्यावर गोडाऊन खाली होतील असे सांगितले जात आहे.


 


सध्या पावसाळा चालू झाला असून शेतकऱ्यांचे धान पाल टाकून पाण्यात आहेत, यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तालुक्यातील विविध ठिकाणी धान खरेदी केंद्राचे उदघाटन झाले मात्र अद्याप धान खरेदी चालू झाले नसून शेतकरी चिंतेत आहेत.


 

Leave a Comment