“जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या कार्यवाहीने” महसूल व पोलीस विभागांचे पितळ उघडे ?

  • चार टीप्पर व सात पोकलॅड मशीन सह मोठा वाळू साठा जप्त, जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले!

गोंदिया, दि. 12 जानेवारी : जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या असल्या तरी महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांचे तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी 11 जानेवारी च्या रात्रीला अचानक छापा टाकून केलेल्या कार्यवाहीत 7 पोकलॅड मशीन, 4 टिप्पर व सुमारे 1000 ब्रास वाळू जप्त केली आहे.

तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणतेही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात 24 तास अवैध्यरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल व पोलीस विभागाकडे करुनही यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानक घाटकुरोडा घाटावर धडक कारवाई केली आहे.

या कारवाई 7 पोकलॅड मशीन, 4 टिप्पर जप्त केले आहे. या कारवाईमुळे तिरोडा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मुखसंतीने बिनधास्तपणे वाळू घाट सुरू असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यासंदर्भात महसुली अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें