कोसमतोंडी ते मुरपार /लें. या मार्गाचे डांबरीकरण कधी ?, शेतकरीच टाकतात दरवर्षी मुख्य मार्गावर मुरूम

  • शेतकरीच करतात स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती

सडक अर्जुनी, दि. 11 जानेवारी ( बबलु मारवाडे ) : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम मुरपार /लें. या गावाकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या टोकावर असलेले हे गाव विकासापासून वंचित असल्याचे चित्र आहे, हे गाव नवेगाव नागझिरा या व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असून हे गाव बप्पर झोन मध्ये येते आणि त्यामुळेच या गावाकडे राजकीय नेत्यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे लोक चर्चेतून गावकरी सांगतात. खा. प्रफुल पटेल हे २००९ – २०१४ या कालावधी मध्ये खासदार झाले तेव्हा कोसमतोंडी मुरपार /लें. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते,

गावकऱ्यांनी सांगितले की त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता, दरम्यान या रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांच्या सौभाग्यवतीनी गावात येऊन गावकऱ्यांना आश्वासन दिले होते, रस्त्याचे काम झाले, मात्र त्यानंतर या गावाकडे कुठल्याही नेत्याने फिरवून पाहिलं नाही, या रस्त्याची डागडुजी देखील अद्याप करण्यात आली नाही, राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केले असले तरी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज होती, मात्र त्यांनी देखील या गावाकडे भिरकून पाहिलं नाही.

  • या भागात होते उशाची शेती

गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो, असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारचे शेती करतात, या भागात मुख्यत शेतकरी उसाचे उत्पन्न घेतात, त्याचबरोबर काशी कोहळा, मक्का, टरबूज, एप्पल बोर व भाजीपाल्याची देखील शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, हा उत्पन्न केलेला माल वाहनाने वाहतूक करताना शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागते, अनेक वेळा अपघात देखील होतात, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने, ऊस वाहतूक करताना, रस्त्याच्या खड्ड्यात वाहन जाऊन वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून, स्थानिक शेतकरी दरवर्षी या मार्गाच्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकतात, अनेक वर्षापासून या गावाकडे, आमदार व खासदार महोदयांचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुरपार/ ले. गावाकडे जाणारा रस्ता संपूर्ण खराब आहे तर मुरपारटोली कडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दैनिय अवस्था झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही मार्गाचे रुंदीकरण व्हावे अशी ही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

  • शेतकरीच करतात स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती

या गावातील सर्व शेतकरी मिळून स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करतात, दुरुस्ती म्हणजेच काय, तर मार्गावर मरून टाकतात, खड्ड्यामध्ये वाहन जाऊन अपघात होऊ नये, त्यासाठी हा प्रयोग गेले अनेक वर्षापासून सुरू असून, या भागातील शेतकरी त्रासले आहेत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे. सडक अर्जुनी तालुक्याच्या टोकावर असलेल्या, या गावांमध्ये पूर्वी बस सेवा सुरू होती, मात्र तब्बल सहा ते सात वर्षापासून या गावाकडे बस येत नाही त्यामुळे, ज्यांच्याकडे साधन नाही अश्या शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांना पायी प्रवास करावा लागतो. तालुक्यापासून हे गाव अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना साधन उपलब्ध होत नाही. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी दुसरीकडे आजही देशातील नागरिकांना सोयी सुविधांच्या अभावामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

या भागातील म्हणजेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे दोनदा आमदार व एकदा जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून असलेले राजकुमार बडोले तर एकदा आमदार असलेले मनोहर चंद्रिकापुरे त्यानंतर पुन्हा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार झालेले राजकुमार बडोले या दोन्ही नेत्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. निवडणुकांचे वेळी नागरिकांपर्यंत जाऊन मतदानाची मागणी केली जाते मात्र विकासाचे वेळी आमदार झाल्यानंतर दुर्लक्ष होते असे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. मुरपार/ले. येथील महिला सरपंच यांच्याशी भ्रमणध्वनी वरून आम्ही संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

 

Leave a Comment

और पढ़ें