मेलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास.

गोंदिया शहरालगतच्या तलावात हजारो माशांचा मृत्यू

गोंदिया, दि. 19 मे : येथील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर जवळील देवबोडी या तलावात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छोटा गोंदिया परिसरात हा तलाव असून यामध्ये गोंदिया शहरातील दूषित पाणी जमा होतो. याची तक्रार अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडे केली.

मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. दरवर्षी या ठिकाणी माशांचा मृत्यू होतो. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे 24 तासात प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. उपाययोजना झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी मिडियाशी बोलताना दिला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें