निर्माणाधीन पाणी टाकी केली जमीनदोस्त, कंपनीला ५० हजार रुपये दंड


  • नियमानुसार बांधकाम न केल्याने कारवाई…

गोंदिया, दी. 06 ऑक्टोबर : निर्माणाधीन जलकुंभाचे बांधकाम मानक व नियमानुसार होत नसल्याच्या कारणावरून ८० टक्के बांधकाम झालेला जलकुंभ जमीनदोस्त केल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील चिचगावटोला येथे उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यात ४७६ कोटी खर्चातून जवळपास २५० गावांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणी टाकीचे निर्माण करण्यात येत आहे.



मात्र, या निर्माणाधीन कार्याला देखील अनियमिततेचे गालबोट लागले आहे. असाच प्रकार गोरेगाव तालुक्यातील चिचगावटोला येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी जि. प. सदस्याने जिल्हा परिषदेकडे ६ महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. तक्रार करूनही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत पाणी टाकीची पाहणी केली. या पाणी टाकीच्या कामात दोष आढळल्यानंतर निर्मानधीन बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला ५० हजार रुपये दंड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठोठावला आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या इतर पाणी टाकीची तपासणी केल्यास अनेक बांधकामात दोष आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अनिल पाटील ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) : यांनी सांगितले की या पूर्वी त्याला सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्याने दुर्लक्ष केले आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर चे काम उशिरा सुरू झाल्यामुळे त्याला एक हजार रुपये प्रती दिवस प्रमाणे दंडित केला आहे. पुढे असेच काम सुरू राहिल्यास त्याला बल्याक लिस्ट करू, तोंडलेल्या टाकीची जाबाबदारी ही ठेकेदारची असेल.

जितेंद्र कटरे ( तक्रारदार / जि.प. सदस्य ) : त्या पानी टाकीचे दोन कॉलम तिरपे झाले होते, त्या मुळे तिला पाडण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास जिल्हयात 100 ठिकाणी पानी टाकी निर्माण करण्याचे काम चालू आहे. ईनजिनियर ची कमतरता अशल्याने प्रतेकशात ते कामावर हजर राहत नाही, परिणामी ठेकेदार आपल्या मर्जिणे कामे करतात. आणि असे प्रकार घडत आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें