- भंडारा रोड रेल्वे पोलिसांची धडक कारवाई, 2 लक्ष 77 हजार रुपयाचा सोने चांदी सहित इतर साहित्य जप्त.
भंडारा, दी, 06 ऑक्टोबर : रेल्वे प्रवाशांची लूटमार करणाऱ्या 3 अट्टल महिला चोरांना पोलिसांनी पकडले. भंडारा रोड रेल्वे पोलीसांनी ही करवाई केली. ह्या महिला चोर गाड़ी संख्या 12409 गोंडवाना एक्स ह्या गाडीत मागच्या जनरल डब्ब्यात दळून बसल्या होत्या. सदर महिला सोने, चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरी करून प्रसार होत असल्याची रेल्वे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने सापळा रचून चोरांना पकडण्यात आले.
रेणु सुनील पात्रे ( 24) सादूरी लोढे सुभाष लोढे ( 35 ),काजल संग्राम लाड़े (25 ) असे अटक झालेल्या 3 महिला आरोपीची नावे आहेत. तिन्ही महिलांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. शेवटी गाडीखाली उतरवून पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची तपासणी करण्यात आली. यात महिलांकडे मोठ्या प्रमाणात दागिने व इतर साहित्य दिसून आले.
विचारणा केली असता सुरुवातीला साहित्य त्यांचेच असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी पोलीस हिसका दाखवताच त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. महिला पोलीसाकडून तपासणी केली असता महिला चोरांकडून सोने चांदी मोबाईल व इतर साहित्य मिळून 2 लक्ष 77, हजार 600 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी तक्रार क्र ; 204 अन्वये कलम 379 & 34 गुन्हा दाखल केला आहे.