जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शाळा शुभारंभ व नवागतांचा स्वागत


सडक / अर्जुनी, दिनांक – ३० जून २०२२ – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शाळा शुभारंभ व नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. सर्व नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. शालेय परिसर रांगोळ्या व फुलांनी सजविण्यात आला होता. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी नियमित शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. यावेळी मुख्याध्यापक सुनील भीमटे, शिक्षक अनिल बोरकर, जयपाल मोटघरे, अनिल कापगते, लोकेश रहांगडाले, प्रा. डॉ मुकेश मेंढे, स्वदीप रामटेके, प्रीती टेम्भुर्णीकर, दमयंती तुरकर, प्रतिभा बाकडे, मोहन कोहळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक अनिल बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.


 

Leave a Comment