महापुरुषांचा आदर्श ठेवून प्रगती साधा – आमदार मनोहर चंद्रिकापुरे


गोंदिया, दिनांक – 26 नोव्हेंबर 2021 – महापुरुषांनी समाजाला सातत्याने पुढे नेण्याचा मार्ग दाखविला आहे, त्यामुळे महापुरुष हे सर्वासाठी आदर्श आहेत, महापुरुषांचे विचार घराघरापर्यत पोहचविणे गरजेचे आहेच परंतु त्या विचाराला प्रयत्नाची जोड़ देवून प्रत्येकाने महापुरुषाच्या आदर्शाचा अंगीकार केला, तर प्रगती साधना येणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.

सडक/अर्जुनी तालुका जवळच्या तिडका येथे मंडई निमित्त आयोजिम ‘ प्रतिशोध कुंकवाचा ‘ या नाटकाचे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते, नाटकाचे उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक लंजे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश काशिवार तालुकाध्यक्ष राकॉप सड़क/अर्जुनी, एस चन्द्रा ग्रुप संस्थापक तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ अजय लांजेवार , माजी जि . प . सदस्य रमेश चुर्हे.

गंगाई तंत्रज्ञान कृषी महाविद्यालयाचे संस्थापक रविंद्र पंचआई , सेवानिवृत्त उपसचिव दुलाराम चंद्रिकापूरे, ग्रामसेवक सुभाष तागडे , पो.पाटील जसवंत गावतुरे , तंमुस अध्यक्ष टिकाराम गावतुरे , सौ . सुनंदा पंचभाई , ग्रा.प.सद गीता बाळणे ,’ बिरला राणविर , दुलीचंद तागडे , दुर्योधन गावपुरे , गीरीधारी पेटकुले , जयपाल पेटकुले , श्रीराम निपाने, लिलाधर कोटवार , भावलेकर दिनेषापंचभाई , मंगल बोळणे , मधुकर गुरुनुले, अविनाश यावलकर, नारद गावतूरे, बलदेव कोटवार, उमराव गावतुरे, हेमराज सोनुले, संजू कांबळे, प्रमोद पेटकुले, आदिंसह प्रतिष्ठित मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विनोद कावळे यांनी केले तर प्रस्ताविक रामरतन पंचभाई यांनी केले


 

Leave a Comment