आमगाव, दी. 08 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम माल्ही येथील शेतकरी मिलिंद देवराज बिसेन यांच्या शेतातील एचएमटी जातीच्या धानाचे पूजने ( दी. 07 रोजी च्या रात्री ) जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे जवळपास 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. ही आग कुणी लावली याची माहिती मिळाली नाही.
तरी शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी तलाठी लाडे, बीट जामदार उके, पत्रकार राजीव फुंडे, सरनागत, कमलेश कोडापे, राजेश मानकर, महारवडे उपस्थित होते. अज्ञात वेक्तीने ही आग लावली असून आगीवर नियंत्र करण्यात आले, मात्र तो पर्यंत धानाची गंजी ( पुजना) संपूर्ण जळून नष्ट झाले. यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 354