अर्जुनी मोर. दी. 02 डिसेंबर : शेतकरी बांधवांचे 8810 प्रोत्साहन पर राशीचे प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तसेच जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकाची मागील 14 वर्षापासून निवडणूक झालेली नाही, प्रशासक का नेमले नाही, अशा विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आल्या या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या असे मांडोदेवी देवस्थान येथे विविध सेवा सहकारी संघटना गोंदिया जिल्ह्याची बैठक दी. 01 डिसेंबर रोजी घेण्यात आली.
बैठकीत मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष डोमाजी बोपचे मार्गदर्शक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी चे उपसभापती विश्वनाथ राहंडाले, मोरगाव अर्जुनी सेवा सहकारी संस्थेचे आणि तालुका संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुदे व संपूर्ण जिल्ह्यातील अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, मोहगाव येथील संस्थेचे अध्यक्ष प्यारेलाल गौतम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार विविध सेवा सहकारी संस्था संघटनेचे कोषाध्यक्ष डॉक्टर योगेश हरिणखेडे यांनी मानले.