सौंदड, दी. ३० नोव्हेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात दि. २८ नोव्हेंबर २०२४ ला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने व लो. शि. संस्थेचे सहसचिव मा.एम .एन. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा व महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी.एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, श्रीमती के. एस. काळे यांनी संत ज्ञानेश्वर माऊली व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका के.एस. काळे यांनी संत ज्ञानेश्वर माऊली व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यालयातील वर्ग अकरावी विज्ञान ची नेहा तुरकर या विद्यार्थिनीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या गायल्या. यावेळी कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स.शि. यु. बी. डोये यांनी केले तर आभार आर.आर. मोहतुरे सर यांनी मानले.