पुन्हा गोंदिया जिल्ह्यात बसचा झाला अपघात 

गोंदिया, दी. 30 नोव्हेंबर : देवरी तालुक्यातून चिंचगड कडे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जातं असलेल्या मानव विकास च्या निळ्या बस चा अपघात झाला सुदैवाने ही बसं रिकामी असल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

रोजच्याप्रमाणे आज दी. 30 नोव्हेंबर रोजी देखिल देवरी येथून ही बसं शालेय विदयार्थना आणण्यासाठी चिंचगड कडे जातं असताना अब्दुल टोला गावा जवळ चालकाचा बस वरून नियंत्रण सुटला आणी बसं सरळ रस्त्याचा कडेल खांली उतरली तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी याची माहिती गावाकऱ्याना व पोलिसांना दिली.

पोलिसांनी व गावाकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत वाहक आणी चालकाला बस मधून बाहेर काढत देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, यात चालक आणी वाहक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर विशेष बाब म्हणजे कालच गोंदिया कोहमारा रोडवर एस.टी बस चा अपघात झाला असता 11 लोकांचा मृत्यू झाला होता तर 29 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

असे असताना आज सकाळी पुन्हा एकदा एस टी बस चा अपघात घडल्याने एस टी बस मध्ये प्रवास करावे की नाही असा प्रशन शालेय विद्यार्थी आणी प्रवास्यांना पडला आहे.

Leave a Comment

और पढ़ें