४२ प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बस चे अपघात, ११ ठार, तर २९ प्रवाशी जख्मी, वाहन चालक पसार 

  • मृतकांच्या परिवारांना १२ लाख रुपयाची सहाय्यता राशी मिळणार. 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. २९ नोव्हेंबर : गोंदिया कोहमारा मार्गावर असलेल्या ग्राम डव्वा नजिक असलेल्या ग्राम बिंद्राबन जवळ असलेल्या डब्बल पुला समोर शिवशाही बस चे भीषण अपघात झाले, ही बस भंडारा बस आगारातून लाखनी, साकोली, सौंदड, कोहमारा मार्गे गोंदिया बस आगारात जात असताना हा भीषण अपघात आज दिंनाक : २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१ :०० वाजता झाला, बस क्रमांक एम. एच. ०९ इ. एम. १२७३ असे आहे, एका प्रवाशाने दिलेल्या माहिती नुसार बस चे चालक हे वाहन खूप जोरात चालवत होते, अश्यात घटना घडली त्या परिसरात मार्गावर मोठी वळण आहे, समोरून येणाऱ्या ट्रक ला बस धडणार त्या मुळे वाहन चालक याने आपल्या ताब्यातील वाहन दुसर्या बाजूने घातले, भरधाव वेगात असलेली बस अनियंत्रित झाल्याने बस जमीन दोष झाली आणि यात निष्पाप ११ प्रवाश्यांचे जीव गेला तर २९ प्रवाशी मधून काही प्रवाशी गंभीर जख्मी देखील आहेत.

  • पोलिस घटना स्थळावर दाखल झाले.

लागलीच घटना स्थळी डूग्गिपार पोलिस व महामार्ग पोलीस दाखल झाले, हा मार्ग ७५३ नंबर चा राज्य मार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी जमली, घटना थळी दृश्य संपूर्ण विद्रूप होते. अपघात होताच वाहन चालक घटना स्थळावरून पसार झाला, बस चे अपघात इतके भीषण होते की जागीच १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर अन्य २९ प्रवाशी जख्मी असल्याने त्यांना सडक अर्जुनी, डव्वा व गोंदिया अश्या वेग वेगळ्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, घटना स्थळी मृतदेह पाहून अनेकांचे हृदय भरून आले, ही बस अनियंत्रित झाल्यामुळे लांबवर फरफटत गेली त्या मुळे बस खाली दबलेल्या अनेक प्रवाशांच्या मृत्यू झाला या घटने मुळे संपूर्ण राज्यात हळहळ वेक्त होत आहे. तर घटना स्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती, या घटने मुळे तब्बल २ तास वाहतुकीचा खोळंबा झाला. 

  • १० लाख रुपयाची सहाय्यता राशी 

राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांच्या कुटुंबांना १० लाख रुपयाची सहाय्यता राशी देण्याचे आश्वासन दिले आहेत, तर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आव्हान केले असून त्याचा खर्च शासनाच्या तिजोरीतून करण्याचे आवाहन केले आहे.

  • खासदार प्रशांत पडोळे यांची मागणी

तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मृताकांना २५ लाख रुपये भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे.

  • केंद्राकडून २ लाख रुपयाची सहाय्यता राशी मिळणार 

तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकांच्या परीवारांना २ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • वाहन चालक नसेत होता का ?

बस मध्ये एकूण प्रवाशी ४० होते त्यात वाहन चालक व कंडक्टर मिळून ४२ प्रवाशी संख्या असल्याचे ही सांगितले जाते, अश्यात कंडक्टर देखील जख्मी झाल्याची माहिती मिळत आहे, तर एक महिला पोलिस सिपायाचा देखील दरम्यान बस मध्ये प्रवास करताना मृत्यू झाला आहे. वाहन चालक नसेत होता का याचा शोध प्रशासनाने घेण्याची व योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • मृत प्रवाशांची यादी खालील प्रमाणे.

१) स्मिता विक्की सुर्यवंशी, २) मंगला राजेश लांजेवार, ३) राजेश देवराम लांजेवार, ४) कल्पना रविशंकर वानखेडे, ५) रामचंद्र कनोजे, ६) अंजिरा रामचंद्र कनोजे, ७) आरीफा अजहर सय्यद, ८) नयना विशाल मिटकर, ९) अजहर अली सय्यद, १०) अनोळखी इसम व ११) अनोळखी इसम असे मृतकांची नावे असून दोन प्रवाशांची ओळख अजूनही पटली नाही.

  • जखमी प्रवाशांची नावे खालील प्रमाणे.

१) धृविका स्वप्नील हेमने, २) टिना यशवंत दिघोरे, ३) नैतिक प्रकाश चोधरी, ४ ) श्रीकृष्ण रामदास उके, ५) शारदा अशोक चौहाण, ६) पल्लवी प्रकाश चौधरी, ७) लक्ष्मी धनराज भाजीपाले, ८) स्वप्नील सुभाष हेमने, ९) विद्या प्रमोद गडकरी, १०) भार्गवी राजेश कडू, ११) रविशंकर रामचंद्र वानखेडे, १२) संजय नेतराम दिघोरे, १३) रामकला संजय हुकरे, १४) शंकर देवाजी हुकरे, १५) नितीन पांडूरंग मते, १६) देवेंद्र मधुजी मेश्राम, १७ राहूल माधुरी कांबळे, १८) खफिजा सय्यद, १९) वैभव गडकरी, २०) अलतमस सैय्यद, २१) अनंतराम धमगाये, २२) प्रमिला भिमटे, २३) रमेश गोंविदा आगरे, २४) सुजित धनंजय रामटेके, २५) दर्गावाई सोमवंशी, २६) मुकेश गणपत नागदेवे, २७) रोशनी रमेश आगरे, २८ संताप कालीराम गजभिये, २९) योगेश्वरी केंद्रे अशी जख्मी प्रवाशांची नावे असून त्यांचे उपचार सुरू आहे. यात १० प्रवाशी गंभीर जख्मी असून त्यांचे उपचार सुरू आहे, त्या मुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. झालेल्या दुर्देवी घटना बद्दल आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, माजी खासदार सुनील मेंढे, खासदार प्रशांत पडोळे, सह राजकीय नेत्यानी यावर संवेदना वेक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें