- गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या राजोली – भरनोली भागातील गावांचा विकास वडिलांनी केला : सुगत चंद्रिकापुरे
गोंदिया, दि. 10 नोव्हेंबर 2024 : राज्यात निवडणुकीच्या प्रचार सभा जोमात सुरू आहेत, गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी या भागातील विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी देखील कंबर कसली आहे ते प्रहार जनशक्ती च्या बॅट या चिन्हावरून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अपक्ष निवडणूक लढत आहेत.
5 नोव्हेंबर पासून प्रचार सभेला उमेदवारांनी सुरुवात केली आहे, सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रचारसभांचा रणसिंग फुंकला असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी चंद्रिकापुरे सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचे त्यांनी सांगितलं, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या भागाचा विकास करण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र विरोधकांना विकास पुरुष नको आहे त्यामुळे त्यांची तिकीट या ठिकाणी कापून एका निष्क्रिय उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे.
असेही ते म्हणाले ते एवढ्यात न थांबता पुढे म्हणाले त्यामुळे जनता आता माझ्यासोबत आहे, मला जर या ठिकाणी जनतेने निवडून दिले तर या भागात उद्योग निर्माण करण्यासाठी माझी पूर्वतयारी झाली असल्याची माहिती अपक्ष उमेदवार चंद्रिकापुरे यांनी दिली आहे, गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या राजोली भरणोली या भागात 09 सप्टेंबर रोजी प्रचार दौरा पोहोचला दरम्यान अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या भागात रोड रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत, त्यामुळेच सुगत चंद्रिकापुरे यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
कुठलाही नेता एका वेळेस संपूर्ण विकास कामे करत नाही त्याला वेळ द्यावे लागते, ज्यांना तुम्ही यापूर्वी दहा वर्ष दिले त्यांचा तर विकास कुठेही दिसत नाही, मात्र वडिलांनी 3 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात खेचून आणली आहे.
या भागातील राहिलेले कामे आपण निश्चित करणार आणि जनतेला निराश करणार नाही, असाही शब्द सुगत चंद्रिकापुरे यांनी दिला आहे, नवका उमेदवार असला तरी अनेक ठिकाणी त्यांचा दणदणीत फटाक्यांच्या आवाजात स्वागत केला जात आहे, तर आरत्या ओवाळून पुष्प माला विजय तिलक लाऊन त्यांचे स्वागत केले जात आहे, लहान मोठ्यांना नतमस्तक होत, ही प्रचार सभा पुढे जात आहे, अनेक ठिकाणी महामानवांच्या प्रतिमांचे पूजा अर्चना केली जात आहे, त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बड्या पक्षांच्या नेत्यांमध्ये धास्ती पसरली आहे, “बंदेमे दम है” असे बोलले जात आहे.