वाघ नदी पात्रातून डिझेल टँकर गेला वाहून, विडियो वायरल

गोंदिया, दी. 10 सप्टेंबर : प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिल्यानंतरही नागरिकांचे दुर्लक्ष, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल, गोंदिया जिल्ह्यात आज दी. 10 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस सुरू होते, अश्यातच देवरी तालुक्यातील वाघनदी काठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला, असे असताना देखील लोहारा गावा जवळील बाग नदी पात्रामध्ये एक अज्ञात ( ट्रक ) डिझेल टँकर वाहताना विडियो मध्ये दिसत आहे.

हा विडियो सध्या सोसल मिडियावर खूप वायराल झाला असून ट्रक कुणाचा आहे, किवा कुठला आहे या बाबद माहिती अजून समोर आली नाही, मात्र विडियो काढन्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी विडियो मध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजावरून समजत आहे. जिल्हा प्रशासनाणे वारंवार सतर्कतेचा इशारा दिल्या नंतर देखील या ट्रक चालकाने पुलावरून पाणी वाहत असताना आपला ट्रक पाण्याच्या प्रवाहात टाकला असावा असा अंदाज आहे त्या मुळे सदर ट्रक वाहून गेल्याचे विडिओ वरुण लक्ष्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें