सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : तहसील कार्यालयासमोर मौजा – केसलवाडा, ता. स/अर्जुनी, जि. गोंदिया येथील महिला भगिनी वन जमिनीतील शासकीय गट क्र. 281 क्षेत्र 9.51 हे. आर. जमीनीपैकी दिलेला पट्टा रद्द होईपर्यंत आमरण उपोषणा चे हत्यार उपसले याची माहिती सडक अर्जुनी तालुका कमिटी काँग्रेस कार्यालयाला होताच जिल्हाअध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांना 09 सप्टेंबर रोजी दुपारी भेटले.
यावेळी तालुकाध्यक्ष मधुसुदन दोनोडे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले, दिनेश हुकरे सेवादल अध्यक्ष, संतोष लाडे, स्वप्नील ब्राम्हणकर उपस्थित होते. उपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्याशी चर्चा करून उपोशषणकर्त्यांची मागणी मान्य करावी म्हणुन काँग्रेस शिष्टमंडळाने उचलून धरली तर उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे मान्य केले, अखेर सायंकाळ पर्यन्त उपोषण कर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने गावकर्याणी आनंद वेक्त केला.
