गोंदिया, दी. 09 सप्टेंबर : विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत 13 सप्टेंबरला गोंदियात वरिष्ठ कॉग्रेस नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाची घोषणा घेतलेल्या पत्रपरिषदेत केली आहे. कॉग्रेस पक्षा कडून सतत ५ वेळा आमदार राहिलेले गोपाल अग्रवाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भरतीय जनता पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश करीत गोंदिया विधानसभेचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली होती.
मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. तर गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात राहून सुद्धा आणि सत्तेत सहभागी असताना सुद्धा हव्या त्या प्रमाणात गोंदिया विधानसभेचा विकास न करता आल्याने आगामी विधानसभा निवडणुका पाहता कॉग्रेस पक्षात घर वापसी करीत असल्याचे माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी आज दी. 08 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्र परिषद सांगितले आहे.
तर माजी आमदार गोपाल दास अग्रवाल हे कॉग्रेस पक्षात घर वापसी करत असल्याने आयोजित पत्र परिषदेत गोंदिया जिल्यातील कॉग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे, जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, कॉग्रेस नेते अमर वऱ्हाडे, गप्पू गुप्ता, पपू पटले या शह इतर कॉग्रेस पदाधिकऱ्यानी माजी आमदार गोपल दास अग्रवाल यांचा पुष्प गुच्छ देत स्वागत केला. तर येत्या १३ सप्टेंबरला गोंदियात आयोजित कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे घर वापसी करणार असल्याने कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.