अर्जुनी मोर, दि. 09 सप्टेंबर : वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या मंत्राचा जाप करून अनेकांचे संकट हरतात, आणि प्रभावित होऊन अनेक जण गणरायाची पूजा अर्चना करतात, तर काहींना लहान पणापासूनच भक्तीची आवड असते, गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी अर्जुनी मोर. नगर पंचायत चे नगरसेवक दानेश भाऊ साखरे यांनी आपल्या निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे यंदा देखील श्री. गणरायाची विधिवत प्रतिस्थापना केली आहे.
आता आपण म्हणणार यात काय नवीन आहे. तर ते आपण पुढे पाहूच पण दानेश भाऊ कोण हे आहेत ते आदी जाणून घेऊ या. साखरे हे अनुसूचित जाती समाजातील असून लहान पानापासून हिंदू धर्मातील देवी देवतांना ते मानणारे आहेत तर त्यांची पत्नी या अनुसूचित जन जाती समाजातील आहेत, त्या देखील पती सोबत गणरायाची पूजा अर्चना करतात, सकाळी सायंकाळी आरती करतात, तर देशातील अनेक जाती व पंथाचे लोक श्री गजाननाच्या पुजेला उपस्थित राहून देवाकडे आपले मागणे मागत असतात.
आपण अनेकदा पाहिलं असेल की मुस्लिम समाज देखील खेळी मेलीच्या वातावरणात खांद्या खांदा लावत विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होतात, सांगायचं म्हणजे गणरायाचे आगमन होताच सर्व जाती धर्म विसरून भक्त आपल्या भक्तीत तल्लीन होतात, तसेच दानेश भाऊ यांना देखील गणरायाच्या भक्तीची आवड लहान पानापासून आहे. यावेळी त्यांनी अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रातील जनेतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव एवढे मागणे श्री गजाननाच्या चरणी मागितले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे, तरी शेतकऱ्यांना घरघोस उत्पन्न मिळो अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली असून या मंगल प्रसंगी त्यांचे वडील मदन साखरे, पत्नी स्वाती साखरे, कन्या मनस्वी साखरे, चिरंजीव जय साखरे व संपूर्ण परिवार सह कार्यकर्ते यांच्या उपस्थित श्री. गणरायाची स्थापना करण्यात आल्याचे साखरे सांगतात. त्यांनी साखरे परिवारा कडून सर्वांना गणेशउत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.