डुग्गीपार पोलीसांची कामगिरी, हरवलेले 9 मोबाईल मुळ मालकांना दिले परत. 

सडक अर्जुनी, दि. 05 सप्टेंबर : पोलीस स्टेशन डुग्गीपार क्षेत्रातील नागरिकांचे हरविलेल्या मोबाइल बाबत तक्रारी प्राप्त होताच तक्रारींची वेळीच दखल घेवून CEIR Portal द्वारे व सायबर सेल, गोंदिया यांचे मदतीने हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला व आज दि. 4 सप्टेंबर रोजी मिळून आलेले एकुण 9 अॅन्ड्राइड मोबाइल अर्जदारांना पोलीस स्टेशनला बोलावून परत करण्यात आले. पो.स्टे. हद्दीतील नागरिकांचे मोबाइल हरविताच त्याबाबत पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार करण्याची जनजागृती करण्यात आली.

सदरची कार्यवाही गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोंदिया, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार व पोहवा जगदीश मेश्राम, पोना महेंद्र सोनवाने, पोना रविंद्र रामटेके, पोशि उद्देभान रुखमोडे, चापोशि निखील मेश्राम यांनी केली.

Leave a Comment

और पढ़ें