सडक अर्जुनी, दि. 29 ऑगस्ट : मालवण येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाच्या दुर्घटनेत दोषी असणाऱ्यावर कडक कारवाही करण्या संदर्भाने सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या वतीने आज दि. 29 ऑगस्ट रोजी मुक आंदोलन करीत तहसिलदार यांच्या मार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महा. शासन यांना निवेदन पाठविले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मालवन येथील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त् झाला हे अंत्यंत वेदनादायी व मनाला संताप आणणारे आहे. केवळ ८ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. पुतळा उभारतांनी अक्षम्य् त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही.
या दुर्घटनेचा निषेध म्हणुन सडक/अर्जुनी तालुका रॉ. काग्रेस पक्षातर्फे मुक आंदोलन स्थानिक तहसिल कार्यालय समोर करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना घड्डु नये याची खबरदारी म्हणुन निषेद वेक्त करण्यात येत आहे. जे कोणी या घटनेस जबाबदार असतील त्याच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाही करण्यात यावी याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे करीत आहोत.
सरकारणे अहोरात्र काम करुन राजकोट किल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्य्मान, सुर्याचा इतीहास सांगणारे स्मारक आणि शक्तीशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी सडक अर्जुनी तालुका रॉ. कॉग्रेस पार्टी च्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार, रजनी गिऱ्हेपुंजे महिला तालुका अध्यक्ष, राहुल यावलकर तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, रमेश चुर्हे माजी जी.प. सदस्य, शिवाजी गहाने प.स. सदस्य, दीक्षा भगत, अफरोज फारुख शेख, शशी टेंभूर्ने, अ.स. बडोले, उमराव मांढरे, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, करुणा गेडाम, संध्या श्रीरंगे, वनिता गहाने, भागवत झींगरे, कमलेश वालदे, आनंद अग्रवाल सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.