अर्जुनी मोर., दि. 27 ऑगस्ट : तालुक्यातील ईटखेडा येथे महिला प्रभाग संघ भवन बांधकामाचे भूमिपूजन आज दि. 27 रोजी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग संघ भवन बांधकामाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी प्राप्त होणार असून महिलांच्या हक्काचे एक सभागृह त्यांना उपलब्ध होणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या उद्योगाकडे वळुन स्वतःची प्रगती कशाप्रकारे साधता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, इटखेडा, येथील सरपंच आशाताई झिल्पे, मंजू ताई चंद्रिकापुरे, तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, उद्धव मेहंदळे, श्रावण मेंढे, प्रभाग संघाचे अध्यक्ष निशाताई मस्के, कोषाध्यक्ष आशाताई नाकाडे, महिला प्रभाग व ग्राम संघाचे पदाधिकारी दिनेश भेडारकर, कविता मेश्राम, दीपिका डोंगरवार, कविता दहिवले अरुणा लोणारे, लता ठाकरे वैशाली डोंगरवार, तनु रेषा रामटेके, हर्षला रामटेके, दुर्गा भोयर, विशाखा रामटेके, विद्या गेडाम, अंशूला रामटेके, रजनी बडोले, कुंदा कुंभरे ,अंजली अंबादे, कविता शहारे, नूतन वॉल्दे, रजनी बडोले, प्रीती रंगारी, भाग्यश्री बुराडे, रजनी बागडकर, सविता गणवीर, रागिनी रामटेके, तनुरेषा जांभुळकर, अरियल मैद, कविता मेश्राम, प्रेमलता नाईक, दर्शना गोंडाणे, रत्नमाला कुलबांधे, रोहिणी नेवारे, जयवंत मारगाये, सविता सुखदेवे, दुर्गा कापगते, कल्पना खोब्रागडे, वर्षा मस्के, रसिका शहारे, सुनंदा राऊत, निराशा लंजे, वंदना कोल्हे, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.