राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

  • थायलंड वरून आणलेल्या बौद्ध मुर्त्यांचे भन्ते च्या हस्ते वितरण

सडक अर्जुनी, दि. 25 ऑगस्ट 2024 : माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा गोंदिया जिल्याचे माजी पालक मंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन येथे 25 ऑगस्ट रोजी आंतराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या धम्म परिषदेत आंतराष्ट्रीय बौद्ध भिकूनी हजेरी लावली असून थायलंनड वरून आंनलेल्या भगवान तथागत बौध्द यांच्या अष्टधातूनच्या मुर्त्या गोंदिया जिल्यातील बौद्ध विहाराणा वितरित करण्यात आल्या आहेत.

जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथगात गौतम बुधाच्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आज 25 ऑगस्ट रोजी राजकुमार बडोले फाउंडेशन तथा गगणं मलिक फाउंडेशन च्या वतीने आतरराष्टीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले आणि गगणं मलिक यांनी दिली आहे.

तर येत्या काळात लवकरच या मतदार संघात बौद्ध धम्म शाळा सुरु करणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली असून या आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बौध्द बांधवानी मोठी गर्दी केली असून परदेशातून आलेल्या बौद्ध भिकूनी उपस्थिताना बौध्द धर्मा बद्दल माहिती दिली असून 3 हजारच्या वर बौद्ध बांधवानी या बौद्ध धम्म परिषदेत हजेरी लावली होती तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितीच्या लोकांना भन्तेच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मुर्त्या वाटप करण्यात आल्या. 

देशात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याची आवश्यकता : गगन मलिक 

गगन मलिक हे एक सिनेमा तसेच सिरीयल ॲक्टर आहेत, त्यांनी मंचावरून बोलताना सांगितलं की त्यांनी अनेक सिरीयल मध्ये काम करीत, देवतांचे रोल केले आहेत, त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भूमिका त्यांनी एका सिरीयल मध्ये साकारली आणि सिरीयल दरम्यान भगवान गौतम बुद्ध यांच्या बद्दलची माहिती त्यांना मिळाली त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यातून त्यांना भगवान गौतम बुद्धांची खरी ओळख पटली, त्यानंतर त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा प्रचार करण्यासाठी बुद्ध धर्माचा स्वीकार करून पुढील वाटचाल सुरू केली, त्यांनी मंचावरून बोलताना सांगितले की, नालंदा आणि तक्षशिलासारख्या युनिव्हर्सिटी ची देशामध्ये गरज आहे.

 

आणि त्यासाठी या देशातील नागरिकांनी देखील बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समोर यावे लागेल, भारत देश हा बुद्धाची भूमी आहे, हे आपण परदेशात देखील जाऊन बोलतो, परंतु या देशांमध्ये भगवान गौतम बुद्धांना आपण विसरलो आहे, त्यामुळेच या देशांमध्ये नव्याने बौद्ध स्कूलचे निर्माण आणि त्यामध्ये शिकणारे विद्यार्थ्यांची गरज आहे, आणि ते आम्ही राजकुमार बडोले साहेब यांच्यासोबत सुरुवात केली आहे, बडोले साहेबांसारखे व्यक्तींच्या हातामध्ये पावर असल्यास बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी लागणारा निधी कधीही कमी पडणार नाही, आणि ते कमी पडू देणार नाही.

 

यापूर्वी त्यांनी बौद्ध धर्मासाठी असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच पुनरुत्थान कार्यासाठी मोलाची भूमिका निभावली आहे, मग त्यात लंडन येथील बाबासाहेब आंबेडकरांचे घर असो वा इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांचे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण काम त्यांनी केला आहे. बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर प्रोडक्शन निर्माण करणारी स्कूल आवश्यक आहे, आणि त्यामध्ये शिकवणारे गुरु ( भंते ) म्हणजेच शिक्षक यांची देखील आवश्यकता आहे, त्याचबरोबर महिलांना देखील नन बनविण्यासाठी या ठिकाणी आम्ही नियोजन केला आहे असेही त्यांनी मंचावरून सांगितले.

थायलंड वरून आलेले, बौद्ध भिक्खू यांनी देखील मंचावरून आपले मत व्यक्त केले, पाली भाषेमध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम गगन मलिक यांनी केला आहे. बौद्ध भिक्खूं यांनी सडक अर्जुनी येथे झालेला कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला त्यांनी सांगितलं की येथे सुद्धा बौद्ध धर्माला मानणारे लोक आहेत, तसेच भारतामध्ये जय भीम हा शब्द उच्चारल्यानंतरच बौद्ध धर्माची येथे ओळख होते, असेही त्यांनी सांगितले, त्यांनी सर्वांना आय लव यू मनत जय भीम देखील बोलले उपस्थित बौद्ध बांधवांनी टाळ्यांच्या गडगडात बौद्ध भिक्खूंचे स्वागत केले.

प्रसंगी उपस्थित वाट थाथोंग-शाही मठ बँकॉक थाईलैंड येथील उप मठाधीश व्हेन फ्राखरू शीलाखुंसमोथन, राजकुमार बडोले माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, डॉ. संदेश वाघ विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ, गगन मलिक फिल्म ॲक्टर, डॉ. नटकीट सी. मंगल वाट थायोंग-शाही मठ बँकॉक थाईलैंड, डॉ. चंद्रबोधी पाटील विश्वस्त अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, संजय पुराम माजी आमदार, डॉ.वर्षाताई गंगणे विभाग प्रमुख अर्थशास्त्र देवरी, शारदाताई बडोले संचालक कृ.उ.बा.स. अविनाश काशीवर सभापती कृ.उ.बा.स., यशवंत परशुरामकर सभापती कृ.उ.बा.स. अनिरुद्धजी कांबळे तहसीलदार अर्जुनी/मोर, राजहंस ढोके उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र, अंजनाताई खुणे प्रसिद्ध कवयित्री झाडीपट्टी, चो ग्याल्टसेन अध्यक्ष स्थानिक विधानसभा तीबेटीयन बस्ती महाराष्ट्र, शब्बीरभाई पठाण सामाजिक कार्यकर्ता साकोली, भंते फ्रम्हहा सिरीचय यनावत्थानो प्रशासनिक कार्यालय वाट थायोंग-शाही मठ बँकॉक, भंते संघधातू डव्वा, लायकराम भेंडारकर गटनेता जि. प. गोंदिया, विजय कापगते तालुकाध्यक्ष अर्जुनी/मोर, लक्ष्मीकांत धानगाये तालुकाध्यक्ष सडक/अर्जुनी, डॉ.लक्ष्मण भगत जिल्हा परिषद सदस्य, डॉ.भुमेश्वर पटले जि. प. सदस्य, कविता रंगारी जि. प.सदस्या, पौर्णिमा ढेंगे जि. प. सदस्या, निशा तोडासे जि. प. सदस्या, होमराज पुस्तोडे उपसभापती पं. स.अर्जुनी/मोर, वर्षाताई शहारे पं. स. सदस्य, शालिनी डोंगरे उपाध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र, चेतन वलगाये पं. स.सदस्य सडक/अर्जुनी, उमाकांत ढेंगे माजी सभापती जि. प. गोंदिया, केवळराम पुस्तोडे उपाध्यक्ष ता.ख. वि. अर्जुनी/मोर, काशीम जमा कुरेशी माजी सभापती कृ.उ.बा. समिती अर्जुनी/मोर, तानेश ताराम माजी सभापती पंचायत समिती अर्जुनी/मोर, रूपाली टेंभुर्णे माजी जि. प.सदस्या, शीला चव्हाण माजी जि. प. सदस्या, तेजूकला गहाणे माजी जि.प.सदस्या, अजित मेश्राम महामंत्री अनुसूचित जाती गोंदिया सह मोठ्या संख्येत बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

 

Leave a Comment

और पढ़ें