आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्यांने २० वर्षानंतर वीज वितरण कार्यालयाचे होणार २ उपविभाग

गोंदिया, दि. 25 ऑगस्ट : 1936 मध्ये गोंदिया येथील कार्यकारी अभियंता महावितरण यांचे कार्यालयाची स्थापना झाली होती तेव्हा संपूर्ण गोंदिया तालुक्यात विविध ठिकाणी उपविभागांची निर्मिती केली गेली होती. परंतु दिवसेंदिवस विजेचे वापर आणि नागरिकांच्या समस्या वाढत असताना दुसरीकडे नवीन उपविभागांची व शाखेंची निर्मिती केली गेली नाही.

त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रशासन असमर्थ ठरत होते. ओव्हरलोड, अवकाळी पाऊस, वादळ वारा अशा विविध समस्यांमुळे अनेक वेळेस ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड होऊन दोन ते तीन दिवसापर्यंत संपूर्ण गाव अंधारात राहण्यासारखे समस्या निर्माण होत होत्या.

नागरिकांनी या समस्या घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांचे कार्यालय गाठले. त्यावर उपाय म्हणून आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज मंत्री यांच्याशी संपर्क साधून नवीन उपविभागांची निर्मिती व शाखेची निर्मिती करिता प्रस्ताव सादर केले त्यावर पाठपुरावा करत एक नवीन उपविभाग आणि एक शाखा नव्याने निर्मितीसाठी मंजुरी मिळाली असून या दोन्ही कार्यालयांमध्ये जवळपास 24 पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

या आधी केवळ एकमेव सूर्याटोला (गोंदिया ग्रामीण) येथे उपविभाग होते मात्र आता रावणवाडी येथे उपविभाग तयार झाल्याने याचा ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दासगाव, रावणवाडी, कामठा या क्षेत्रातील नागरिकांना अधिक लाभ होणार आहे. याशिवाय मूर्री येथे नवीन शाखा निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक फुलचूर, हिवरा आणि मुर्री येथील नागरिकांना लाभ मिळणार आहे.

सध्याच्या ग्रामीण उपविभाग अंतर्गत विभाजनानंतर गोंदिया ग्रामीण वितरण केंद्र -१, गोंदिया ग्रामीण वितरण केंद्र -२ व नवीन मूर्री शाखा असे एकूण तीन शाखा कार्यालय असणार आहेत.

तर नवनिर्मित रावणवाडी उपकेंद्र अंतर्गत रावणवाडी वितरण केंद्र तासगाव वितरण केंद्र व कामठा वितरण केंद्र असे तीन शाखा कार्यालय असणार आहेत.

नागरिकांना काय लाभ मिळणार आहे ?

सूर्यटोला उपविभागातून दासगाव रावणवाडी कामठा क्षेत्रातील नागरिकांना सेवा देण्यास पूर्वी लागणाऱ्या कालावधी पेक्षा अर्ध्या वेळेत सेवा प्रधान केली जाणार, कोणतेही तक्रार नोंदविण्यासाठी आता गोंदिया येथे येण्याची आवश्यकता पडणार नाही

ट्रांसफार्मर मध्ये बिघाड झाल्यास ते दुरुस्ती करण्यासाठी आधी सूर्याटोला येथून यंत्रणेला काम करावे लागत होती जी आता रावणवाडी शाखेतून मिळणार असल्याने दुरुस्तीचा कालावधी कमी होणार आहे, मुर्री येथील शाखा कार्यालय स्थापन झाल्याने फुलचूर हिवरा आणि मुर्री येथील नागरिकांना कनिष्ठ अभियंता त्यांच्या कर्मचाऱ्यांसह सेवा प्रदान करणार आहेत

एक उपविभागीय कार्यालय व एक शाखा कार्यालय उघडल्याने नवीन रोजगार निर्मिती शक्य झाली, विजेची चोरी आणि विद्युत हानी कमी करण्यात मदत होईल, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार त्यामुळे सेवा प्रदान करण्यात दिरंगाई होणार नाही, मागील अनेक वर्षांपासून वाढलेल्या वीज ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

या सर्व बदलावामुळे नागरिकांना होणारा विजेचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले तर त्यांच्या मागणीला दुजारा देत तत्काळ या दोन्ही कार्यालयाला मंजुरी देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें