“माझा भाऊ सरपंच” रक्षाबंधन निमित्त सरपंच हर्ष मोदी यांना शेकडो महिलांनी बांधल्या राख्या.

सडक अर्जुनी, दि. 25 ऑगस्ट : तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्वाधिक चर्चेत असलेली ग्राम पंचायत म्हणजे सौंदड आहे. आता एका नवीन उपक्रमासाठी चर्चेत आली आहे. रक्षाबंधन उत्सव निमित्त सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून ग्राम पंचायतीने “माझा भाऊ सरपंच” कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
23 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या उपलक्षावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक वार्डात हा कार्यक्रम झाला असून गावातील सर्व महिला या कार्यक्रमात उपस्थित झाले होते यासाठी सकाळी १०.३० वाजता वार्ड क्र. ०१ येथील दुर्गा मंदिर, ११.३० वाजता शिव मंदिर वार्ड क्र. ०२ , १२.०० वाजता हनुमान मंदिर वार्ड क्र. ०३, १२.३० वाजता संविधान चौक तर दुपारी ०१.०० वाजता गणेश मंदिर वार्ड क्र. ०५ येथे महिलांनी ४५० संख्येत उपस्थित राहुन रक्षा बंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनी स्नेहबंधुभावात साजरा झाला.
रक्षा बंधन निमित्ताने “माझा भाऊ सरपंच” कार्यक्रम साजरा करण्याचा हा दुसरा वर्ष आहे, सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले की गावातील प्रत्येक महिला ही माझी बहिण आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी जवळून बोलण्याची, त्यांच्या अळी अळचनी जाणून घेण्याची वेळ मिळते, गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला, पुढेही याच प्रमाणे कार्यक्रम साजरा करू असे त्यांनी सांगितले, बहिणींना भावाकडून खूप अपेक्षा असतात आणि मी गावाचा सरपंच या नात्याने गावाचा सर्वांगीण विकास करून बहिणींचे रक्षाबंधचें गीप्ट देणार यात काही शंका नाही, गावाचा विकास हाच माझा ध्यास सरपंच हर्ष मोदी.

Leave a Comment

और पढ़ें