सडक अर्जुनी, दि. 22 ऑगस्ट : रक्षाबंधन सणानिमित्त अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अर्धांगिनी सेवानिवृत्त प्राचार्य मंजुताई चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव येथील वासल्य सभागृह येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तसेच जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहमारा येथे 20 ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील महिलांकरिता रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील हजारो महिलांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना राख्या बांधून रक्षाबंधनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महायुती सरकारतर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिला हितासाठी अनेक विविध प्रकल्प राबविले जात आहेत.
यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून माझ्या महिला भगिनी पर्यंत त्याचा लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्नशील असेल असे आवाहन यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना दिले व त्यांचे आभार व्यक्त केले. रक्षाबंधन सणानिमित्त महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर टाकून रक्षाबंधनाची भेट दिली आहे.
याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदतीचा लाभ दिला जात असून नागरिकांच्या पाठीशी सरकार समर्थपणे उभे असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाने, महिला अध्यक्ष सुशीला हलमारे, अर्जुनी मोरगाव च्या नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, माजी जी. प. सदस्य रतिराम राणे, पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार, पुष्पलता दूरुगकर, सडक अर्जुनी येथील तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, महिला अध्यक्ष रजनीताई गिरीपुंजे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, नगर अध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, युवा अध्यक्ष राहुल यावलकर, न. प. सभापती साहिस्ता शेख, दीक्षा भगत, गोरेगाव येथील तालुका महिला अध्यक्ष कल्पना बहेकार, युवा अध्यक्ष सुरेंद्र रहांगडाले, देवाजी बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.